संभाजी ब्रिगेडकडून आसारामच्या आश्रमाची तोडफोड

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलीय.

Updated: Apr 25, 2018, 07:57 PM IST

अकोला : अकोल्यात पातूर रोडवरील आसाराम बापूच्या आश्रमात तोडफो़ड करण्यात आलीय. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केलीय. जोधपूर न्यायालयाने आसारामला बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्यानंतर संध्याकाळी पाचच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आसारामच्या आश्रमात तोडफोड केली. या तोडफोड प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आसाराम बापूचे आश्रम आहेत, या आश्रमात आता पर्यंत कुठेही तोडफोड झाली नाही, ही पहिलीच तोडफोड आहे. काही ठिकाणी आसाराम बापूचे आश्रम खंगत पडले आहेत. तर काही ठिकाणी काही भक्त साफ सफाई करताना दिसतात, मात्र संभाजी ब्रिगेडने आज अकोल्यात आश्रमाची तोडफोड करून सफाई केली आहे. आसारामला शिक्षा सुनावल्यानंतर या निर्णयाचा पहिला पडसाद हा अकोल्यात दिसून आला.