Ram Navami Utsav in Shirdi : महाराष्ट्रातील शिर्डीचे देवस्थान भारताच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. लाखोंच्या संख्येत भक्तांचे शिर्डी साईबाबा हे श्रद्धास्थान आहे. साईबाबांनी शिर्डीत 60 वर्षे मानवजातीची सेवी केली असा धर्मशास्त्रात उल्लेख आहे. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या नगरीत (Saibaba Utsav Shirdi ) रामनवमीनिमित्त साईबाबा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा राम नवमी 17 एप्रिलला आहे. अशात शिर्डी साई उत्सव आजपासून पुढील तीन दिवस 18 एप्रिलपर्यंत साजरा होत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध आहे ते? (Saibaba Utsav Shirdi What is the relationship between Ram Navami and Shirdi Saibaba sairam)
पौराणिक पुस्तक आणि धर्मात असा उल्लेख आहे की, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साई बाबा यांचा जन्म झाला होता. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीही रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. त्यामुळे रामनवमी आणि साई बाबांचा जन्म दिवस एकत्र साजरा करण्यात येतो. तर साईबाबा हे शरद नवरात्रीच्या शेवटच्या म्हणजे दसऱ्याला अंतरध्यान गेले होते. त्यामुळे दसऱ्यालाही शिर्डीमध्ये भक्तांची गर्दी लोटते.
खरं तर धर्मग्रंथात साई बाबांच्या जन्माविषयी फारशी माहिती मिळतं नाही. पण साई सच्चरित्रानुसार 16 वर्षांचे असताना एका व्यक्तीसोबत बाबा शिर्डीत लग्नासाठी आले होते. त्यावेळी म्हाळसापतीने त्यांचं नाव साई ठेवलं. तर काही ग्रंथांमध्ये साई बाबांचा जन्म दिवस हा 28 सप्टेंबर 1835 असू शकतो असा तर्क लावला आहे. खरं तर साईबाबांचा जन्म तारखेबदद्ल कोणतेही पुरावे नाहीत.
साई चरित्राच्या पुस्तकानुसार गोपाळराव गुंडे नावाचा साईबाबांचा एक निष्ठावंत भक्त होता. त्याला अनेक वर्षांपासून मुलं झालं नव्हतं. साई चरणी आल्यावर त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे साईबाबांचे आभार मान्यासाठी तो नवजात बाळासह शिर्डीत आला. त्यावेळी त्याने साईबाबांसमोर एक प्रस्ताव ठेवा. तो म्हणाला की, सुफी संताच्या सन्मानार्थ उरुस म्हणजे मुस्लिमांचा उत्सव असलेल्या थँक्सगिव्हिंग मेळा कराला पाहिजे. साईबाबांनी रामनवमीला उरुसचा दिवस ठरवला. तेव्हापासून शिर्डीत रामनवमीला उरूस काढण्यात येतो. हा सोहळा म्हणजे हिंदू आणि मोहम्मद या दोन समुदायांचं ऋणुबंधाचा मेळा असतो.
या उरूसची अजून एक खासियत आहे. गोपाळराव गुंड यांचा अहमदनगरचा दामू अण्णा कासार या मित्राने जत्रेच्या मिरवणुकीसाठी एक ध्वज निर्माण केला. त्यांच्यानंतर श्री.नानासाहेब निमोणकर यांनीही एक ध्वज तयार केला. हे दोन्ही ध्वज मिरवणुकीत मिरवण्यात आले आणि मशिदीच्या दोन कोपऱ्यांवर ते लावण्यात आले. या स्थळाला साईबाबांनी द्वारकामाई असं नाव दिलं. आजही ही परंपरा पाळली जाते.
शिर्डी अजून एक मिरवणकू काढण्यात येते. त्याला संदल मिरवणूक असं म्हणतात. या मिरवणुकीची संकल्पना मोहम्मद भक्त श्री. अमीर शक्कर दलाल यांची आहे. महान मुस्लिम संतांच्या सन्मानार्थ ही मिरवणूक शिर्डीत काढण्यात येते. या मिरवणुकीत एका ताटात चंदनाची पेस्ट आणि स्क्रॅपिंग्ज. त्याच्यासमोर उदबत्ती लावली जाते. बँडच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात येते. याची अशी एक खासियत आहे की, हिंदूंचे 'झेंडे' आणि मुस्लिमांचे 'चंदन' या दोन्ही मिरवणुका शेजारी शेजारी निघतात. म्हणून शिर्डीत हिंदू आणि मुस्लिम यांची मिरवणूक जगासाठी आदर्श आहे. द्वेषाचा नाही इथे प्रेमाचा उत्साह असतो.