Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामपंचायत (Murud Gram Panchayat) ईडीच्या (ED) रडारवर आली आहे. कारण साई रिसॉर्टसह इतर हॉटेल्स (Sai Resort in Dapoli) संदर्भात चौकशी सुरु करण्यात येत आहे. त्याची माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने मुरुड ग्रामपंचायतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. (Maharashtra News) दरम्यान, ग्रामसेवक आणि सरपंच यांना ईडी कार्यालयात बोलावले आहे. ग्रामपंचायतीमधील ओरिजनल दस्तवेज ईडीला हवेत आहेत. ( ED at Murud Grampanchayat)
दरम्यान, वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने थेट मुरुड ग्रामपंचायत कार्यालयातून जाऊन काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. ईडीने तत्कालीन आणि विद्यमान सरपंचांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. आता ईडीने चौकशीसाठी पावलं उचलली असून चौकशीसाठी दोघांना नोटीस धाडली आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार, हे साई रिसॉर्ट शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्या मालकीचे आहे. तर, अनिल परब यांनी याआधीच आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मात्र, साई रिसॉर्टवरुन ही कारवाई होत असल्याचे पुढे आले आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील सागरी किनाऱ्यावर साई रिसॉर्ट उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट उभारताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झालेले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याबाबत तक्रारही सोमय्या यांनी केली आहे. तसेच मनी लाँड्रिंगही करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
किरीट सोमय्या यांचा दावा अनिल परब यांनी फेटाळला असताना या रिसॉर्टची मालकी आपली असून राजकारणात आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा करत सदानंद कदम यांनी केला आहे. त्यांनीही उच्च न्यायालयात याप्रकरणी धाव घेतली आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, अटक कारवाईबाबत अनिल परब यांनी न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे.