पवारसाहेब, 'तुम्हीही एकदा जेलची हवा खावून पाहा ना'

ईडीवरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे, सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना थेट तुरूंगातली हवा कशी 

Updated: Oct 15, 2019, 01:34 PM IST
पवारसाहेब, 'तुम्हीही एकदा जेलची हवा खावून पाहा ना' title=

पंढरपूर : ईडीवरून सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे, सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना थेट तुरूंगातली हवा कशी असते, ती खावून पाहा, कसं वाटतं, असं आव्हानं देत टीका केली आहे. सदाभाऊ खोत भाजपचे पंढरपूरचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले, 'शरद पवारांना ईडीची नोटीस मिळाली तर त्यांनी एवढा गोंधळ केला, तर त्यांनी जरा आत जावून जेलची हवा खाऊन पाहावी, आत कसं वाटतं, हे त्यांना कळेल'. ते पंढरपुरात सुधाकर परिचारक यांच्या प्रचार सभेत सदाभाऊ खोत बोलत होते. 

सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावरील केसेसची आठवण करून दिली आणि म्हणाले, 'आम्ही शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली, तेव्हा किती केसेस आमच्यावर केल्या. आम्ही जिथं नव्हतो, तिथल्या पण केली आमच्यावर घातल्या. मग पवार साहेब या आतमध्ये जावून, पाहा तिथलीही हवा पाणी, तिथे प्यायला सुजी मिळते, खायला भाकरी मिळते. वेळच्या वेळ सर्व गोष्टींना जायला मिळतं', अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.