निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग

युतीच्या संसारात पुढे काय... ?

Updated: Oct 24, 2019, 11:40 PM IST
निवडणूक निकालानं शिवसेना-भाजपचा अपेक्षाभंग title=

मुंबई : निवडणूक निकालानं भाजपा आणि शिवसेना दोघांचाही अपेक्षाभंग केला आहे. युतीनं सत्ता स्थापन केल्यावर पुढे काय वाढून ठेवलंय, याची झलक निकाल लागल्यावर पुढच्या काही तासांतच पाहायला मिळाली. भाजपाच्या अडचणी समजून घेतल्या, आता समजून घेणार नाही, मलाही माझा पक्ष वाढवायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे महाराष्ट्रात आणि युतीच्या संसारात काय वाढून ठेवलंय, याचा ट्रेलर उद्धव ठाकरेंनी दाखवला. निकाल पूर्ण समोर येण्याआधीच फिफ्टी फिफ्टीच फॉर्म्युलाची आठवणही उद्धव ठाकरेंनी करुन दिली.

यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाही आकडा घटला आहे. पण शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. निकाल लक्षात घेता हो, जे ठरलंय तेच करु, असं म्हणण्यावाचून सध्या भाजपलाही पर्याय नाही. 

गेली पाच वर्षं शिवसेनेला तू लहान भाऊच आहेस, असं सातत्यानं सांगण्यात आलं होतं. आता निकालानंतरही भाऊ लहान असला तरी त्याचा आवाज वाढलाय, हे मोठ्या भावाला समजून घ्यावंच लागेल.