सतीश शेट्टी यांना पोलीस संरक्षण न दिल्याचा ठपका

राज्य मानवी हक्क आयोगानं दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचा आदेश कायम ठेवला आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2018, 09:45 PM IST

पुणे : दिवंगत आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी यांना वेळेत पोलीस संरक्षण दिलं नाही. असा ठपका ठेवत, राज्य मानवी हक्क आयोगानं दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी करण्याचा आदेश कायम ठेवला आहे. 

पुनर्विचार याचिका फेटाळली

आयपीएस अधिकारी रामनाथ पोकळे आणि पोलीस उपायुक्त श्रीकांत कोकाटे यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, आयोगानं पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. 

नातेवाईकांना पंधरा लाख रुपयांची मदत

पोकळे आणि कोकाटे यांची खात्यांतर्गत चौकशीचे आदेश कायम ठेवतानाच, शेट्टी यांच्या नातेवाईकांना पंधरा लाख रुपयांची मदत करावी. हा आदेश देखील आयोगाने कायम ठेवला आहे. जीवाला धोका असल्यानं पोलीस संरक्षण मिळावं. यासाठी सतीश शेट्टी यांनी दोन अर्ज केले होते. 

पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं नाही

मात्र, त्यांना वेळेत पोलीस संरक्षण पुरवण्यात आलं नाही. परिणामी त्यांची निर्घृण हत्या झाली. असं निरीक्षण आणि मतं आयोगाने आदेशात नोंदवलं आहे.