तुमची कार कधीच समुद्राच्या वाळूत घेऊन जाऊ नका...कारण

यातून एक शिकण्यासारखं आहे, समुद्राच्या वाळूत तुमची गाडी घेऊन जावून मस्ती करू नका, नाही तर .

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2018, 09:05 PM IST
तुमची कार कधीच समुद्राच्या वाळूत घेऊन जाऊ नका...कारण title=

वसई :  वसईतल्या भुईगावमध्ये समुद्रात अडकलेली इनोव्हा गाडी अजूनही समुद्रात अडकून आहे. गाडी बुडून 24 तास उलटले तरी ही गाडी काढण्यात यश येत नाहीय.

गाडीला बाहेर काढण्यासाठी धावपळ

गाडीचालक आणि स्थानिक लोक यांची गाडीला बाहेर काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र यातून एक शिकण्यासारखं आहे, समुद्राच्या वाळूत तुमची गाडी घेऊन जावून मस्ती करू नका, नाही तर तुमची गाडी देखील वाळूत रूतेल आणि इंजीनमध्ये खारंट पाणी जाऊन, इंजीनची वाट लागेल.

या गाड्यांना रोखणार कोण?

मात्र या घटनेनंतरही कोणीही कसलाही धडा घेतलेला. गाडी बुडूनही अनेक गाड्या किनाऱ्यावर येत आहेत. मात्र त्यांना रोखणारे कोणीच नाहीत.