मुंबई : भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्याती पिंपरी येथे शाई फेक झाली. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाई फेकीची घटना निंदनियच आहे, मात्र ही घटना घडल्या नंतर तुम्ही ज्या पद्धतीने संतापला त्याच पद्धतीने तुम्ही महापुरुषांच्या बद्दल झालेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भडकला असता तर तुम्हाला मानले असते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिलीय. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिलीये.
असले प्रकार कोणीही करता कामा नये, राजकीय किवा इतर क्षेत्रातील व्यक्ती कोणी काही बोलले असेल तर कोणाला कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. ज्यांनी कोणी हे कृत्य केलं आहे त्याचा निषेध करतो. चंद्रकांतदादा यांनी केलेलं वक्तव्य चुकीचंच त्याचं समर्थन कोणीही, भुमिका आम्ही मांडली करणार नाही. आम्ही विरोध केलाय म्हणून त्यांना संविधानाने शिकवलं आहे म्हणून हातात कायदा कोणी घेऊन नये, ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे करणं अतिशय अयोग्य आहे की त्याचाही निषेध व्यक्त करतो, असं अजित पवार म्हणाले.
औरंगाबादेत मराठवाडा विद्यापिठाच्या संतपीठाच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले. "सरकारवर अवलंबून का राहताय? कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी या देशात शाळा सुरु केल्या. या सर्वांना शाळा सुरु करताना सरकारने अनुदान नाही दिलं. यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरु करायचीय आम्हाला पैसे द्या. तेव्हा 10 रुपये देणारे होते. 10 कोटी देणार लोक आहेत ना"असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.