Maharastra Politics : 'कपटी भाजपचं लक्ष्य...', अजितदादांचे कान टोचत रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले...

Rohit Pawar On Chandrakat Patil : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित पवारांनी संताप व्यक्त केला अन् अजित पवारांचे कान टोचले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Mar 19, 2024, 04:50 PM IST
Maharastra Politics : 'कपटी भाजपचं लक्ष्य...', अजितदादांचे कान टोचत रोहित पवारांची चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले... title=
Rohit Pawar Angry On Chandrakat Patil Over Statement of sharad pawar Maharastra Politics

Rohit Pawar Angry On Chandrakat Patil : शरद पवारांचा पराभव करणं हेच आमचं एकमेव ध्येय आहे. आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा वाटतो, असं चंद्रकांत पाटील (Chandrakat Patil) यांनी म्हटलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या टीकेनंतर राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) चर्चेला उधाण आलं होतं. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे बारामतीच्या राजकारणात वारं फिरणार की काय? अशी धडकी अजित पवार गटाला बसली आहे. अशातच राजकारणात तराजू लावून निर्णय घ्यावे लागतात, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी सुचक वक्तव्य केलं होतं. त्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत कडक शब्दात इशारा दिला आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

सहा दशकं महाराष्ट्राची व देशाची सेवा करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य असल्याचं चंद्रकांत दादांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं, पण त्यासाठी बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून चालवायचीय. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची निती जगजाहीर आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली अन् अजितदादांचे कान टोचले आहेत.

ज्यांनी आपल्याला या स्थानापर्यंत पोचवलं त्या आदरणीय पवार साहेबांच्या पराभवासाठी आपला वापर करुन द्यायचा की नाही, हे आता अजितदादांनीच ठरवायचंय आणि त्यांना ठरवता येत नसेल तर त्यांच्यासोबत असलेल्या पण आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ते ठरवावं. शिवाय पवारसाहेब ही व्यक्ती नाही तर विचार आहे, तो संपवणं भाजपला कदापि शक्य नाही, हेही भाजपाने लक्षात ठेवावं, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

जित पवार विरोधामुळे कौटुंबात एकाकी पडले असताना चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येत शरद पवार यांच्यावर थेट टोकाची टीका केली. बारामती लोकसभेत मला आणि भाजप कार्यकर्त्यांना हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. तसंच शरद पवार यांचा पराभव करणं, आमचं एवढं एकच ध्येय आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी आज बारामतीमध्ये जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतलीय. बारामती लोकसभेतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याची बोललं जातंय.