पोलिस महासंचालकांच्या घरातच चोरी, पुजेचे साहित्य लंपास

नागपूरच्या धरमपेठ परिसरातल्या झेंडा चौकात प्रबीरकुमार चक्रवर्ती यांचे घर आहे.

Updated: Jan 14, 2019, 02:56 PM IST
पोलिस महासंचालकांच्या घरातच चोरी, पुजेचे साहित्य लंपास title=

नागपूर - माजी पोलिस महासंचालक प्रबीरकुमार चक्रवर्ती यांच्या घरात चोरी झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. चक्रवर्ती यांच्या घरातले पुजेचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले. सुमारे ६२ हजारांचा ऐवज चोरीला गेला असून, या प्रकरणी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्रवर्ती यांच्या घरातील एक नोकर बेपत्ता असल्याने त्याच्यावर प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस महासंचालकांच्या घरातच चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या काही दिवसांत नागपूरमधील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घरफोडी आणि चोरीच्या रोज किमान दोन घटना नागपुरात घडताहेत. नववर्षाची सुरुवातच नागपुरात खुनाच्या दोन घटनांनी झाली. आता थेट माजी पोलीस महासंचालकांच्या घरातच चोरांनी हात साफ केल्याने नागपूर पोलिसांवर मान खाली घालण्याची वेळ आली आहे.

नागपूरच्या धरमपेठ परिसरातल्या झेंडा चौकात प्रबीरकुमार चक्रवर्ती यांचे घर आहे. चोरांनी त्यांच्या घरातल्या पूजेच्या साहित्याची चोरी केली. बाजारात या साहित्याची किंमत सुमारे ६२ हजार इतकी आहे. चक्रवर्ती यांच्या घरातला एक नोकर बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: