बँकेच्या बाजूच्या दुकानात भुयार खोदून दरोडा

नवी मुंबईत जुईनगर येथील 'बँक ऑफ बडोदा' शाखेत दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यात कोट्यवधी रूपयांचे सोने लंपास केला असल्याचा अंदाज आहे. 

Updated: Nov 13, 2017, 03:08 PM IST
बँकेच्या बाजूच्या दुकानात भुयार खोदून दरोडा title=

नवी मुंबई : नवी मुंबईत जुईनगर येथील 'बँक ऑफ बडोदा' शाखेत दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यात कोट्यवधी रूपयांचे सोने लंपास केला असल्याचा अंदाज आहे. 

दुकानातून भुयार खोदून चोरी

बँक शेजारील एका दुकानातून भुयार खोदून ही चोरी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  हे दुकान अनेक दिवसांपासून बंद होते, त्यामुळे भुयार खोदण्याचं काम सुरू असल्याचं कुणालाही समजलं नाही. ही चोरी शनिवारी किंवा रविवारी झाली असल्याचा अंदाज आहे. एक लहानसा मुलगा जावू शकेल, एवढंस भुयार या ठिकाणी खोदण्यात आले आहे.

३७ लॉकर्समधील वस्तुचा सफाया

हे भुयार बँकेच्या लॉकरच्या रूमपर्यंत गेलं आहे, बँक ऑफ बडोदाच्या जुई नगर सेक्टर १७ मधील या शाखेत एकूण २३७ लॉकर आहेत, यापैकी ३७ लॉकर्सचा चोरट्यांनी सफाया केला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणी तपास सुरू केला आहे, दरम्यान ही चोरी झाल्याची घटना आज सकाळी बँक उघडल्यावर लक्षात आली.