शिवसेनेचं चिन्हं गोठवण्याबाबत Riteish Deshmukh ची मोठी प्रतिक्रिया

राज्याच्या राजकारणात बॉलिवूडची एन्ट्री... रितेश देशमुखच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण  

Updated: Oct 10, 2022, 08:15 AM IST
शिवसेनेचं चिन्हं गोठवण्याबाबत Riteish Deshmukh ची मोठी प्रतिक्रिया title=

मुंबई : सध्या महाराष्ट्रातल्या घडमोडी इतक्या रंगल्या आहेत, की राजकारणात (politics) पुढच्या क्षणाला काय होईल याबाबत बॉलिवूडला देखील उत्सुकता आहे. अभिनेता रितेश आणि जेनेलियानं (Genelia Deshmukh) नाशिकमध्ये हजेरी लावली. यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडीबद्दल रितेश देशमुख (Riteish Deshmukh) विचारलं असता त्यानं याबाबत आपल्यालाही उत्सुकता असल्याचं सांगितलंय. 

काय म्हणाला रितेश देशमुख ?  (Riteish Deshmukh reaction on state politics)
'राजकारण वेगळी दिशा घेवून जात आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार  हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या सर्वांचं भवितव्य पुढील घडामोडींवर अवलंबून आहे. ' असं मत यावेळी रितेशनं व्यक्त केलं. 

ठाकरे गटानं चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय दिल्यानंतर शिंदे गटाच्या बैठकीतही चार पर्यायांवर चर्चा झाल्याचं समजतंय. उगवता सूर्य, तुतारी, तलवार आणि गदा या चार पैकी तीन चिन्ह शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे. वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे गटाची बैठक पार पडली, या बैठकीत शिंदेंना सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेण्यात आला.

आज सकाळी पर्यायी नावं आणि चिन्हांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत अंधेरी पोटनिवडणूक लढवण्यावरही चर्चा झाल्याचं समजतंय.  शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री बैठकीला उपस्थित होते. 

काय म्हणाले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह (Shivsena Symbol) गोठवण्यात आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर घणाघाती टीका केली... माझ्या आजोबांनी दिलेलं शिवसेना हे नाव आणि बाळासाहेब ठाकरेंनी जपलेलं धनुष्यबाण हे चिन्ह 40 डोक्यांच्या रावणानं गोठवलं... चिन्हं आणि नाव गोठल्यानं महाशक्तीला उकळ्या फुटल्यात, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला...

त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या तीन निवडणूक चिन्हांची मागणी आयोगाकडं करण्यात आलीय. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  अशा तीन नावांची मागणीही करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.