'भाडेवाढ मान्य नसेल तर रिक्षात बसू नका'

वसईत रिक्षावाल्यांची मुजोरी चांगलीच वाढलीय. आरटीओनं भाडेवाढीला परवानगी दिलेली नसतानाही रिक्षा चालक वाढीव भाडे घेऊन सर्रास प्रवाशांची लूट करत आहेत. 

Updated: Sep 26, 2017, 09:01 PM IST
'भाडेवाढ मान्य नसेल तर रिक्षात बसू नका' title=

वसई : वसईत रिक्षावाल्यांची मुजोरी चांगलीच वाढलीय. आरटीओनं भाडेवाढीला परवानगी दिलेली नसतानाही रिक्षा चालक वाढीव भाडे घेऊन सर्रास प्रवाशांची लूट करत आहेत. 

या मुजोरीचा कळस म्हणजे रिक्षा चालकांनी थेट 'भाडे वाढ मान्य नसेल तर रिक्षात बसू नये' असा फलकच लावलाय. 

रिक्षा चालकांच्या या मनमानी कारभाराविरोधात प्रवाशांमध्ये संतापाची लाट पसरलीय. वाढीव भाडे दिले नाही तर रिक्षा चालक भर रस्त्यात प्रवाशांसोब हुज्जत घालून त्यांना अर्ध्या रस्त्यात रिक्षाखाली उतरवतात. 

आरटीओने यावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी रिक्षा चालक आणि स्थानिकांची बैठक घेतली होती. या बैठकीत दोन्ही बाजुंचं म्हणणं ऐकून घेत नायगाव येथील प्रवासी पट्टया आणि इतर सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

मात्र, तोपर्यंत भाडेवाढ स्थगित करण्याचा आरटीओ कार्यालयाने घेतला. मात्र तरीही रिक्षा चालकांनी भाडेवाढ करण्याची मनमानी सुरूच ठेवली आहे. 

मात्र या मनमानी कारभाराविरोधात पोलीस आणि आरटीओ केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.