रिक्षाचालक पत्नीने प्रियकाराच्या मदतीने पतीचा काढला काटा, असं उकललं गूढ

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची रिक्षाचालक पत्नीने (Rickshaw puller Woman ) प्रियकराच्या मदतीने हत्या घडवून आणली.  

Updated: Jun 18, 2021, 06:29 PM IST
रिक्षाचालक पत्नीने प्रियकाराच्या मदतीने पतीचा काढला काटा, असं उकललं गूढ  title=

डोंबिवली : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची रिक्षाचालक पत्नीने (Rickshaw puller Woman ) प्रियकराच्या मदतीने हत्या घडवून आणली. त्यानंतर स्वत:च पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. मात्र, काही तासाच पत्नीची पोलखोल झाली. पती बेपत्ता असल्याचा केलेला बनाव कल्याण क्राइम ब्रान्चच्या पोलिसांनी उघड केला. रिक्षाचालक पत्नीने पतीची हत्याची केल्याचे कबुल केले. त्यानंतर रिक्षाचालक पत्नी आणि तिच्या प्रियकरासह त्यांचा साथीदार पोलिसांनी गजाआड केला. (Rickshaw puller Woman Murdered her husband with the help of her boyfriend )

रिक्षाचालक महिलेने रिक्षाचालक प्रियकरासह आपल्या पतीची हत्या करून त्याचा मृतदेह बदलापूर कर्जत रोडवरील छोट्या पुला खाली फेकून दिल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. आपले कृत्य लपवण्यासाठी तिने पती बेपत्ता असल्याची तक्रार मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली होती. मात्र कल्याण क्राइम ब्रान्चने या महिलेचे बिंग फोडले. तिने आपणच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची कबुली दिली .या प्रकरणी लक्ष्मी पाटील, अरविंद उर्फ मारी रवींद्र राम आणि सनीकुमार सागर या तिघा विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या दरम्यान हत्या करण्यात आलेले प्रविण पाटील हे खासगी कंपनीत नोकरी होते तर लक्ष्मी रिक्षा चालवायची. रिक्षा चालवत असताना तिची अरविंद या रिक्षा चालकासोबत प्रेम सबंध जुळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पत्नीची पती बेपत्ता असल्याची तक्रार

डोंबिवली मानपाडा येथे राहणारा प्रवीण पाटील हा 4 जून पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी लक्ष्मी हिने मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली होती. बरेच दिवस उलटूनही प्रविणचा शोध लागत नव्हता. त्यामुळे प्रविणच्या कुटुंबीयानी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रान्चकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास करत असताना कल्याण पोलिसांनाच्या पथकाला पत्नीवर संशय बळावला. पोलिसांनी तिची चौकशी सुरु केली असता चौकशी दरम्यान तिने खोटी माहिती दिल्याचे पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर पोलिसांनी लागलीच तिच्या संपर्कात असलेल्या अरविंद उर्फ मारी रवींद्र राम आणि त्याचा मित्र सनी सागर याला चौकशी साठी ताब्यात घेत, त्यांना पोलसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली.

असा कट रचत काढला काटा

अरविंदचे लक्ष्मी सोबत पाटील सबंध होते. याची माहिती लक्ष्मीचा पती प्रविणला लागली. या कारणावरून दोघांमध्ये वाद होत होता .त्यामुळे या दोघांनी प्रविणचा काटा काढायचं ठरवले. 2 जून रोजी रात्रीच्या सुमारास प्रविण घरी असताना अरविंद आणि सनी घरी आलेत. त्यांनी प्रविणला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या कृत्यात लक्ष्मी देखील सहभागी होती. त्यांनतर तिघांनी त्याचा गळा दाबून त्यांची हत्या केली आणि त्याचा मृतदेह रिक्षाने नेऊन बदलापूर कर्जत रोडवरील मोरी खाली टाकून दिला, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली.

 त्यानंतर संशय येऊ नये म्हणून लक्ष्मीने मानपाडा पोलीस ठाण्यात प्रविण बेपत्ता असल्याबाबत तक्रार नोंदवली होती. मात्र प्रवीणच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत कल्याण क्राइम ब्रान्चकडे धाव घेतली. कल्याण क्राइम ब्रँचच्या पथकाने मोठ्या शिताफीने या प्रकरणाचा उलगडा केला, अशी माहिती कल्याण क्राइम ब्रान्चे पोलीस निरीक्षक नितीन मगदूम यांनी दिली.