सामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ होणार?

पुणेकरांचा रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास महागणार आहे. पुणे आरटीओ कार्यालयात टॅक्सी, ऑटो चालक मालक संघटनेची बैठक पार पडली. यावेळी भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला. 

Updated: Dec 11, 2023, 08:17 PM IST
सामान्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ होणार?  title=

Pune Auto Rickshaw Fare Hike: पुणेकरांचा रिक्षा आणि टॅक्सी प्रवास महागणार आहे.  पुण्यात प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार आहे. पुण्यात रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे आरटीओ कार्यालयातील बैठकीत टॅक्सीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. 

गेल्या अनेक दिवसांपासून टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी आंदोलन केले होते. आरटीओने त्याचे दर वाढविण्याला परवानगी दिली आहे.39 रुपये आणि पुढील प्रति एक किलोमीटरसाठी 26 रुपये हे जर टॅक्सी साठी निश्चित करण्यात आले आहेत हे आंदोलनाचे यश असून त्याचा सर्वसामान्य टॅक्सी व रिक्षा चालक मालकांना फायदा होणार त्यांचा व्यवसाय वार्तिक उत्पन्न वाढणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.

पुणे आरटीओ कार्यालयात टॅक्सी, ऑटो चालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी बाबा कांबळे यांनी संघटनेच्या वतीने आपली भूमिका मांडली.

महाराष्ट्र रिक्षा पंचायतीच्या वतीने पुणे येथील आरटीओ कार्यालयासमोर आंदोलन करून टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी पाठपुरावा केला होता. तसेच पंत प्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या मागणीला अखेर यश आले आहे. टॅक्सी दर वाढविण्याची कार्यवाही आरटीओने केली आहे.

पुणे आरटीओ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरला 31 रुपये व पुढील प्रति एक किलोमीटरला 21 रुपये दर करण्यात आला होता. त्यावेळी सीएनजी गॅसचा दर हा 86 रुपये होता. त्या सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे एप्रिल 2023 मध्ये निश्चित केलेला दरच कायम करण्यात आला आहे. 

खटवा समितीच्या शिफारशीनुसार काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा ओला उबेरच्या एसी कॅबला 25 टक्के दरवाढ करण्यात यावी अशी शिफारस आहे. या शिफारशीनुसार सध्या झालेल्या आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये असे ठरवण्यात आलेले आहे. त्यानुसार ओला उबेर कॅबचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी 39 रुपये आणि पुढील प्रति एक किलोमीटरसाठी 26 रुपये दर शिफारस म्हणून पाठवण्याचे ठरले आहे.

RTO कडून भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर

पुणे RTO कडून टॅक्सी, ऑटो  भाडेवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. आता प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर  रिक्षा आणि टॅक्सीची भाडे वाढ लागू होणार
 आहे.