रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला विरोध

  मिऱ्या - नागपूर अशा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुद्धा विरोधाचं ग्रहण लागलंय. कालपासून या महामार्गासाठीची भूसंपादन प्रकिया केली जातेय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 23, 2017, 11:00 PM IST
रत्नागिरी - नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाला  विरोध title=

रत्नागिरी :  मिऱ्या - नागपूर अशा महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुद्धा विरोधाचं ग्रहण लागलंय. कालपासून या महामार्गासाठीची भूसंपादन प्रकिया केली जातेय. मात्र कुवारबाव मधल्या ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी महामार्गाच्या भूसंपादनाला विरोध केलाय.

४५ मीटर रुंदीकरणाची भूमिका 

महामार्ग चौपदरीकरणासाठी महामार्गापासून ३० मीटरपर्यंत जागा संपादनाची मागणी असताना प्रशासनानं ४५ मीटर रुंदीकरणाची भूमिका घेतलीय. त्यामुळे आज पुन्हा एकदा या जमीन भूसंपादनाला कुवारबाव मधल्या व्यापाऱ्यांनी विरोध केलाय. 

दुकानदारांचा भूसंपादनालाा विरोध 

त्यामुळे आज दुकाने बंद ठेवून या भूसंपादनालाा विरोध करण्यात आला. सकाळपासून कुवारबाव बाजारपेठ आज बंद होती. तर इथं भूसंपादनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला.