Maratha Kunbi Reservation: मोनज जरांगे यांच्या जीवाची काळजी आणि आरोग्याची चिंता सरकारला आहे. राज्यात एकोपा, शांतता, सुव्यवस्था आबाधित रहावी यासाठी सरकारचे प्रयत्न. मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीच्या दृष्टीने जीवाच्या दृष्टीने जरांगे पाटील यांनी तातडीने आरक्षण मागे घ्यावं असा ठराव सर्वपक्षियांनी केला. सरकार आणि सर्व पक्षीय मनोज जरांगे यांच्या सोबत आहे. समितीला निर्णय घेण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती मनोज जरांगे यांना करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संध्याकाळी साडे सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक पार पडली. या बैठकीला सर्वपक्षांच्या मराठा नेत्यांसह ओबीसी नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते.
जालना येथे लाठीचार्ज करणाऱ्यांवर कारवाई होणार. लाठीचार्ज प्रकरणी तीन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेय. मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणार. जवळपास सर्व मागण्या सरकाराने मान्य केल्या आहेत. कुणाचेही आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार नाही. मराठा आरक्षण टिकेल याची काळजी सरकार घेणार. मनोज जरांगे यांनी सरकारने गठित केलेल्या समितीला निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ द्यावा. याकरिता जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी तातडीने उपोषण मागे घ्यावं तसच मराठा आरक्षणासंदर्भात एक समिती गठीत करून त्याचं नेतृत्त्व अजित पवारांनी करावं असा ठराव आजच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय. गेल्या अडीच तासांपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीत खल सुरू आहे. या बैठकीत जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं हीच राज्यसरकारची भूमिका असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय.
जरांगेंच्या उपोषणापूर्वी सर्वपक्षीय बैठक का घेतली नाही असा सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केला. कुणबी प्रमाणपत्र कायद्यात बसत असेल तरच द्या आणि शक्य नसेर तर तसं स्पष्ट सांगा असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिलाय. आपण बैठकीला येणार नव्हतो . मात्र समाजाच्या भावना मांडयच्या होत्या त्यामुळे आपण हजेरी लावली. तसंच बैठकीच्या सुरूवातीलाच आपण मुद्दे मांडून बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठवाड्यातल्या मराठ्यांना मागासवर्गीय आरक्षण देतंय तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडे मारलंय...? अशा शब्दात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधलाय...तसेच पक्षांतरामुळे अजित पवारांना विसर पडला असेल, असा टोलाही पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना लगावलाय. तर मनोज जरांगेंनी पृथ्वीराज चव्हाणांना उत्तर दिलंय. तुमच्याकडे निजाम नव्हता तर घेऊन जायला हवं होतं असा टोला जरांगेंनी लगावालय.