संगमेश्वरात नांगरणी स्पर्धेदरम्यान बैल उधळले

बैलगाडी स्पर्धांवरील बंदीनंतर आता नांगरणी स्पर्धा कोणते वळण घेते ? यावर बंदी कधी येणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Updated: Aug 12, 2019, 06:24 PM IST

प्रणव पोळेकर, झी मीडिया, मुंबई :  रत्नागिरीमध्ये नांगरणी स्पर्धेच्या नावाखाली एक जीवघेणा प्रकार समोर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव इथं भाजपाच्या वतीने ही नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अचानक बैल उधळले आणि ते लोकांच्या अंगावर गेले. 

संगमेश्वरमधील पाडगावमधील स्पर्धेदरम्यान नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्यालाही बैलांनी अक्षरश: ओढत नेलं. वाटेत येणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर हे बैल धावून गेले... आवेळी उपस्थितांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण पसरलं. बैलगाडी स्पर्धा बंद झाल्याने कोकणात अशी नांगरणी स्पर्धा भरवल्या जातात.

बैलगाड्या स्पर्धेला बंदी नंतर कोकणात नांगरणी स्पर्धा सुरु झाल्या. यात बैलांना धावडवण्यासाठी खिळे टोचणे, मारझोड करणे असे प्रकार समोर आले आहेत. या घटनेत नांगर धरणाऱ्याच्या हातून बैलांवरचा ताबा सुटला. त्यांनतर बैल सैरावैरा धावू लागले. त्यामुळे यानिमित्ताने बैल आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. बैलगाडी स्पर्धांवरील बंदीनंतर आता नांगरणी स्पर्धा कोणते वळण घेते ? यावर बंदी कधी येणार असे प्रश्न उपस्थित होत आहेत.