रत्नागिरी : खेड दापोली आणि मंडणगडमधील जलयुक्त शिवार प्रकरणी आता एसीबीनं चौकशी सुरु केलीय. या तीन तालुक्यातील जलयुक्त शिवार मधल्या कोट्यावधींच्या भष्ट्राचार झी 24 तासाने उघड केला होता.
या प्रकणाची आता रत्नागिरीतल्या एसीबीच्या कार्यालयाच्या माध्यमातून याची चौकशी सुरु झालीय. डिवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून हि चौकशी सुरू करण्यात आली असून. या प्रकणातील चौकशी समितीची टीम दापोलीत दाखल झालीय.
आज दिवसभर या प्रकरणात एसीबीची टिम चौकशी करणार आहे. दापोलीतील जलयुक्त शिवाराची कामे झालेल्या वणौशी, पंचनदी, फरारे गावातली पाहाणी या समितीनं पुर्ण केलीय. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्र्याचे एक पत्र रत्नागिरीतील एसीबी कार्यालयाला प्राप्त झालं.
यात मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार काल खेडमधील जलयुक्त शिवारची पाहणी करुन आज ही कमिटी दापोलीत पोहचली आहे. आज बंधाऱ्यांची पाहणी करुन प्राथमिक चौकशी सुरु केलीय.
पहिल्या टप्यातील हि चौकशी असणार आहे. तर यानंतर कृषी विभागातील कागदपत्रांची छाननी आणि त्यानंतर अधिकाऱ्यांची चौकशी असे या चौकशीचे टप्पे असणार आहे.