कोकणला 'सोबा' चक्रीवादळाचा मोठा धोका

कोकणला पुन्हा चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.  

Updated: Dec 4, 2019, 06:09 PM IST
कोकणला 'सोबा' चक्रीवादळाचा मोठा धोका title=

रत्नागिरी : कोकणला पुन्हा चक्रीवादळाचा धोका आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. सोबा चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात नवे संकट घोंघावण्याची शक्यता आहे. पुढील बारा तासात वादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीत धडकणार आहे. ताशी ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे धोका लक्षात घेऊन कोणीही समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकणाला पुन्हा सोबा चक्रीवादळाचा धोका असल्याने पुढील बारा तासात सोबा चक्रीवादळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी किनारपट्टीत धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या वादळाचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटर असणार आहे. आरबी समुद्रात आग्नेय आणि मध्यपूर्व व लक्षद्वीप भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे वादळ तयार झाल्याचं बोललं जात आहे.

गेल्या तीन महिन्यातील हे तिसरे वादळ असून यामुळे किनारपट्टी भागातील मासेमारी ठप्प झाली आहे रत्नागिरीच्या मिरकरवाडा समुद्रात अनेक नौका सुरक्षित हलविण्यात आल्या आहे. कोकणात आतापर्यंत सहा वादळांचा धोका निर्माण झाल्याने याचा फटका मासेमारीला बसला आहे. त्यामुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे.