अंतिम वर्षांच्या परीक्षेत गोंधळ कायम; विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्ताप

परीक्षेसाठी ऍप उघडताच 

Updated: Oct 13, 2020, 08:41 AM IST
अंतिम वर्षांच्या परीक्षेत गोंधळ कायम; विद्यार्थ्यांना पुन्हा मनस्ताप title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : मागील काही महिन्यांपासून पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा गोंधळ पाहायला मिळाला. कालांतरानं यावर तोडगाही काढण्यात आला. पण, अद्यापही काही विद्यापीठांमध्ये मात्र ही गोंधळाची परिस्थिती कायम असून, विद्यार्थ्यांना आणखी मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेचा गोंधळ अजूनही सुरुच आहे. सोमवारीसुद्धा या विद्यापीठाच्या ऍपनं विद्यार्थ्यांना हैराण करून सोडलं. नागपुर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाचे सोमवारी ४० पेपर होते. 

सुमारे १० हजार परीक्षार्थी परीक्षा देणं अपेक्षित होतं. मात्र परीक्षेसाठी ऍप उघडताच सुरुवातीला अनेकांना लॉग इन होतं नव्हतं. विद्यापीठानं दिलेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकूनही ऍप उघडत नसल्याच्या तक्रारी विद्यापीठाकडे आल्या आहेत.

 

काही विद्यार्थ्यांचं लॉग इन झाल. त्यांनी पेपर सोडवलासुद्धा. पण, तो वेळेत जमा झाला नसल्यानं विद्यार्थी त्रस्त झाले. विद्यापाठीठाची परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. मात्र परीक्षांदरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या गोंधळामुळं परीक्षार्थी विद्यार्थांना चांगल्याच मनस्तापाला सामोरं जावं लागलं. पहिल्या दोन दिवस परीक्षांमध्ये खूप अडचणी आल्या मात्र तिस-या दिवशी परिस्थिती काहीशी सुधारून परीक्षा सुरळीत पडल्या. पण, पुन्हा सोमवारीही परीक्षांमध्ये गोंधळ झाल्यानं विद्यार्थी परीक्षेसाठी तयार असले तरीही विद्यापीठाची मात्र तयारी झाली नसल्याचं यावेळी स्पष्ट झालं.