''तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन'', धमकी देऊन पुण्यातील महिलेवर सतत ४ वर्ष बलात्कार

कोल्हापूरच्या एका महिलेसोबत सोशल मीडियावर त्याने मैत्री केली, यानंतर पुण्यात येऊन तो तिला भेटला.

Updated: Sep 10, 2021, 10:21 PM IST
 ''तुझे अश्लील फोटो व्हायरल करेन'', धमकी देऊन पुण्यातील महिलेवर सतत ४ वर्ष बलात्कार title=

पुणे : कोल्हापूरच्या एका महिलेसोबत सोशल मीडियावर त्याने मैत्री केली, यानंतर पुण्यात येऊन तो तिला भेटला. तो पुण्यात तिच्यासोबत फिरला, तिला पुण्यातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला, तिला न सांगता, न कळत तिचं अश्लील चित्रण आणि फोटो काढले. तिचे अश्लील फोटो आणि व्हीडिओ तिला दाखवत, मी हे सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी देत तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. हे एक दिवस किंवा काही महिने नाही, हे सतत ४ वर्ष पुण्यात सुरु होतं.

या प्रकरणात आणखी एक संपातजनक बाब म्हणजे ही महिला ५४ वर्षांची आहे, तर तिच्यावर सतत ४ वर्ष बलात्कार करणारा आरोपी संजीव वर्मा हा गाझियाबाद उत्तर प्रदेशचा असल्याचं महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपी हा ४८ वर्षांचा आहे, याच्यासोबत मंजुला धरक नावाच्या हिमाचलच्या आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

हा प्रकार पुण्यातील स्वारगेटजवळील एका हॉटेलात सुरु झाला २०१७ ते २०२१ पर्यंत हा प्रकार सुरु होता. काही दिवसांपूर्वी आरोपीने हे फोटो तिच्या मेहुण्याला पाठवून हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली, यानंतर फिर्यादीने त्रास असह्य झाल्याने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला.