काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Updated: Jul 18, 2017, 09:09 AM IST
काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल title=

पुणे : पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

कायदा सल्लागार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेने त्यांच्याविरोधात विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री उशीरा रोहीत टिळक यांच्यावर कलम ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०५, ५०७ यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. 

बलात्कार करणे मारहाण करणे जीवे मारण्याची धमकी देणे, अशा स्वरुपाचे आरोप रोहित टिळक यांच्यावर करण्यात आलेले आहेत. एका कार्यक्रमा दरम्यान महिलेची रोहीत टिळक यांच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर रोहीत टिळक यांनी २०१५ ते २०१७ या काळात आपले शोषण केल्याची तक्रार आहे. 

रोहित टिळक हे युवक कॉंग्रेसचे समन्वयक असून त्यांनी २००९ मध्ये पुण्यातील कसबा मतदार संघातून विधानसभेची निवडणूकदेखील लढवलेली होती.