रायगड : काल संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर आज पहाटेपासून कमी झाला असला तरी महाड पोलादपूर तालुक्यात अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
रात्री महाड, नागोठणे, रोहा, गावांना रात्री पुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र, रात्री थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतल्याने धोका टळला.
सावित्री, गांधारी, आंबा, कुंडलिका नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत आल्या होत्या. महाड-रायगड रस्त्यावर दस्तुरी नाक्यावरती काल दोन फुटांपर्यंत पाणी आल्याने रात्री हा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. पहाटेपासून पाणी ओसरल्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.