Raj Thackeray: मागील काही दिवसांपासून राज्यात (Maharastra Politics) छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळतंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या (Bhagat Singh Koshyari) वक्तव्यानंतर हा वाद पेटला होता. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी कोश्यारींवर टीकास्त्र देखील सोडलं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी ऐतिहासिक मुद्द्यावर भाष्य करत मोठं वक्तव्य केलंय. राज ठाकरे सध्या कोकण (Raj Thackeray In Konkan ) दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी चौफेर टीका देखील केली.
आजपासून राज ठाकरे यांच्या सिंधुदुर्गातून (Raj Thackeray in Sindhudurg) दौऱ्याला सुरुवात झाली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बऱ्याच दिवसापासून कोकणात (Kokan) यायचं होतं. संघटनात्मक बांधणीसाठी कोकण दौरा असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी शिवरायांच्या इतिहासावरून सुरू असलेल्या वादावर बोट ठेवत मोठं वक्तव्य केलंय.
आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी (Maratha) किंवा ब्राह्मणांनी (Bramhan) लिहिलेला नाही. मोगल, पोर्तुगीज, ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या. महाराजांच्या काळातील एक ग्रंथ होता आणि तो म्हणजे शिवभारत (Shivbharat). त्यात ज्या ज्या गोष्टी सापडतात, त्या आपल्यासमोर आहेत. त्याशिवाय काही ऐतिहासिक दाखले किंवा पत्र देखील नाहीत. त्यामुळे प्रतापराव गुजर आणि त्यांच्यासोबत कोण सहा जण होती?, याला काही अर्थच उरलेला नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
सिनेमॅटिक लिबर्टी (Cinematic Liberty) घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास दाखवूच शकत नाही, असं मोठं वक्तव्य देखील राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यावेळी केलंय. इतिहासाला धक्का बसणार नाही, हे बघणं देखील गरजेचं आहे. शिवरायांच्या धक्का लावणारा मायेचा पूत अजून जन्माला येयचाय, असं आक्रमक वक्तव्य राज ठाकरेंनी यावेळी केलंय.
आणखी वाचा - राज्यातील वादांबद्दल राज ठाकरे यांचे भाष्य, शरद पवारांवर साधला निशाणा
दरम्यान, काल राज ठाकरे यांनी कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर ते कोकणात दाखल झालेत. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर राज ठाकरे संवाद साधणार आहेत. यावेळी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कोकण दौऱ्यावर असणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटी घेतली.