मुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, रत्नागिरीत मुसळधार बरसणार

राज्यात जोरदार पाऊस  (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain warning in Mumbai and Maharashtra,) तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील.  

Updated: Jul 19, 2021, 08:00 AM IST
मुंबईसह राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, रत्नागिरीत मुसळधार बरसणार title=

 

मुंबई : राज्यात जोरदार पाऊस  (Rain) कोसळत आहे. मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) किनारपट्टीसाठी पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Rain warning in Mumbai and Maharashtra,) तर 50 ते 60 किमी प्रती तास या वेगाने वारेही वाहतील. 23 तारखेस देखील संभाव्य कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जोरदार पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.  मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. तर रत्नागिरीतही मुसळधार पाऊस बरसणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीला कालरात्रभर मुसळधार पावसाने झोडपले आहे. आजही ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत दरडी कोसळून 33 बळी

काल मुसळधार पावसामुळे मुंबईत दरडी कोसळून 33 बळी गेले आहेत. चेंबूरमध्ये 21 तर विक्रोळीत 10 तर भांडूपमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारची 5 लाखांची तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर कण्यात आली आहे. मुंबईत जोरदार वादळी पाऊस झाला आहे. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत 200 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाचा फटका हा वसई-विरार शहराला बसला आहे. विरारमधील जाधव पाडा येथील चाळीत पाणी शिरले होते. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. यात अडकून पडलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस

गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस झाला. दिवसभरात  केवळ रिपरिप सुरू असली तरीही रात्रीपासून ते सकाळ होईपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. तर साकीनाका भागातील संघर्षनगर येथे डोंगरावरील दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामध्ये संघर्षनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका इमारतीला या दरडीचा भाग येऊन धडकल्याने हानी पोहोचली. दुर्घटनेत एक जण जखमी झाला.

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या.  चेंबूरमध्ये दरड कोसळली त्या ठिकाणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सकाळी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, शनिवारी रात्रीपासून मुंबईत तीन तासांत अडीचशे मिमी पाऊस पडला म्हणजेच ताशी 80 मिमी पाऊस पडला. ही अतिवृष्टीच होती. त्यामुळे ही दुर्घटना घडली. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती निर्माण झाली. उद्यानातील कार्यालये व कर्मचाऱ्यांची सेवा निवासस्थाने येथे पाणी शिरले. 

मुंबईत जोरदार वादळी पाऊस झाला आहे. रविवारी पहाटेपर्यंत मुंबईत 200 मिलीमीटरपेक्षाही अधिक पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाचा फटका हा वसई-विरार शहराला बसला आहे. विरारमधील जाधव पाडा येथील चाळीत पाणी शिरले होते. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले होते. यात अडकून पडलेल्या नागरिकांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. गेले दोन दिवस मुंबईत वादळी पाऊस झाला. दिवसभरात  केवळ रिपरिप सुरू असली तरीही रात्रीपासून ते सकाळ होईपर्यंत ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. तर साकीनाका भागातील संघर्षनगर येथे डोंगरावरील दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामध्ये संघर्षनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका इमारतीला या दरडीचा भाग येऊन धडकल्याने हानी पोहोचली. दुर्घटनेत एक जण जखमी झाला.

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या.  चेंबूरमध्ये दरड कोसळली त्या ठिकाणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी सकाळी भेट दिली. त्यावेळी ते म्हणाले की, शनिवारी रात्रीपासून मुंबईत तीन तासांत अडीचशे मिमी पाऊस पडला म्हणजेच ताशी 80 मिमी पाऊस पडला. ही अतिवृष्टीच होती. त्यामुळे ही दुर्घटना घडली. रविवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पूरस्थिती निर्माण झाली. उद्यानातील कार्यालये व कर्मचाऱ्यांची सेवा निवासस्थाने येथे पाणी शिरले. 

पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा 

हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस दिलेला पावसाचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगरपालिका तसेच इतर सर्व यंत्रणांनी अपेक्षित तसेच अनपेक्षितरित्या देखील घडणाऱ्या दुर्घटनांच्या बाबतीत अतिशय सावधगिरी बाळगावी व समन्वयाने काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दिले.  मुंबईत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.  

पुढचे 5 दिवस 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून अलर्ट

मुख्यमंत्र्यांच्या काही महत्त्वपूर्ण सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या, विशेषत: दरडीकोसळू शकतात अशा ठिकाणी पालिकेचे लक्ष असले तरी अनपेक्षित दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. आज चेंबूर, विक्रोळी येथील दुर्घटनेत संरक्षक भिंतीच्या वरून मागील टेकडीचा भाग घरांवर पडल्याने मोठ्या प्रमाणावर मलबा पसरून प्राणहानी झाली ही गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. गेल्या वर्षी देखील मलबार हिल येथे टेकडीचा भाग अचानक खचला होता. उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या टॉवर्सखाली मोठ्या प्रमाणावर वस्त्या आहेत, त्याबाबतही वीज कंपन्यांना तातडीने सांगून खबरदार राहण्यास सांगावे.
 
पाऊस थांबल्यानंतर मोडकळीस आलेल्या इमारती अधिक कमकुवत होऊन त्यांचा काही भाग पडून मोठी दुर्घटना घडते. मोडकळीस आलेल्या इमारती मग त्या पालिका किंवा म्हाडाच्या अखत्यारीतील असोत, खूप धोकादायक इमारतीतील रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर काढून त्यांना स्थलांतरित करा.सर्वच यंत्रणांनी बचाव पथके तयार ठेवावीत व आपापल्या नियंत्रण कक्षांना एकमेकांशी सातत्याने संपर्कात राहण्यास सांगावे.कोविड केंद्र व फिल्ड रुग्णालयांतील डॉक्टर्स व वैद्यकीय पथकांना देखील मदतीसाठी तयार ठेवावे.
अर्धवट बांधकामे, मेट्रोची व इतर कामे यामधून भरपूर पाऊस झाल्यास पाणी साचून दुर्घटना होऊ नये तसेच त्यानंतरही त्या ठिकाणी पाणी साचलेले राहून मलेरिया, डेंग्यू, लेप्टो सारखे रोग पसरवू नये म्हणून विशेष काळजी घ्यावी व पाण्याचा निचरा लगेच होईल हे पाहावे.

'फिव्हर क्लिनिक्स सुरु करा'

यावेळी बोलतांना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे असे सांगून महत्त्वपूर्ण सूचना केल्या. ते म्हणाले की, पाऊस ओसरल्यावर मलेरिया, डेंग्यू, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते, कोविडचा धोका तर कायम आहे, यासाठी ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक्स सुरु करा. लसीकरण केंद्राच्या ठिकाणी देखील नागरिकांना त्यांच्या तापाबाबत तपासणी व मार्गदर्शन हवे. गृहनिर्माण संस्थांमधून देखील याविषयी जनजागृती करा.

पालिकेचे अधिकारी-कर्मचारी  24 तास ड्युटीवर

मुंबईतील जोरदार पावसाबाबत माहिती देताना महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल म्‍हणाले की, काल रात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस कोसळून अवघ्‍या काही तासांमध्‍ये 200 मिलीमीटरपेक्षा जास्‍त पावसाची नोंद झाली आहे. या पावसात वाशीनाका परिसरातील वंजारतांडा येथे संरक्षक भिंत कोसळली. तसेच विक्रोळीतील पंचशील चाळीवर दरडीचा भाग कोसळला. या दोन प्रमुख दुर्घटनांसह अन्‍य एक घटना मिळून एकूण २७ नागरिकांचा दुर्दैवी मृत्‍यू ओढवला आहे. या दुर्घटनांच्‍या स्‍थळी बचाव आणि मदतकार्य तातडीने करण्‍यात आले आहे. पालकमंत्री आदित्‍य ठाकरे आणि अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त श्रीमती अश्‍विनी भिडे यांच्‍यासह भेटी देवून यंत्रणांना आवश्‍यक ते निर्देश दिल्‍याचेही श्री. चहल यांनी नमूद केले.

'आजारांचा फैलाव होवू नये म्हणून काळजी घ्या'

अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी म्‍हणाले की, मलेरिया, डेंगी आणि लेप्‍टो या आजारांचा फैलाव होवू नये म्‍हणून आवश्‍यक प्रतिबंधक उपाययोजना देखील सातत्‍याने सुरु आहेत. मलेरियाचे प्रमाण यंदाही पूर्णपणे नियंत्रणात असून आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात असल्‍याचे श्री. काकाणी यांनी नमूद केले.