नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगेत बोलेरो दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू

तांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Updated: Jul 18, 2021, 07:07 PM IST
नंदुरबारमधील  सातपुडा डोंगर रांगेत बोलेरो दरीत कोसळली, 8 जणांचा मृत्यू  title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : नंदुरबारमधील सातपुडा डोंगर रांगेत दरीत बोलेरा गाडी कोसळ्याची माहिती समोर येत आहे. तोरणमाळ-सिंदिदिगर रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी बोलेरो गाडी दरीत कोसळली आहे. या अपघातात  8 जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचं समजत आहे. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच युद्धपातळीवर बचावकार्य सुरु केलं गेलंय. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. (Bolero van falls in Satpuda mountain range in Nandurbar 8 deaths)

ज्या ठिकाणी हा अपघात झालाय, त्या ठिकाणी कोणत्याही टेलिकॉम कंपनीचं नेटवर्क नाहीये. त्यामुळे या अपघाताची माहिती उशीरा समोर आली. तसेच नेटवर्क नसल्याने बचाव कार्य करण्यास अडथळा निर्माण होत आहे. दरम्यान  या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केलंय. तसेच पोलीस अधिक्षकांसह मोठा फौजफाटा तिथे उपस्थित आहे. मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरु आहे.