कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरावरील पत्रे उडाले

उकाड्यापासून कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात  काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत.

Updated: Mar 19, 2022, 06:10 PM IST
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरावरील पत्रे उडाले title=

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक घरावरील पत्रे उडाले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. अचानक आलेल्या या पावसामुळे मोठ्या उकाड्यानंतर हवेत गारवा निर्माण झाला असून यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Rain In Kolhapur)

अचानक आलेल्या या पावसामुळे कोल्हापूरकरांची चांगलीच धावपळ झाली. अवकाळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची ही शक्यता आहे.

हवामान खात्याने 19 ते 21 मार्च दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस /गडगडाटाची शक्यता वर्तवली आहे.