मग आम्हीं काय येडे हाय का? जयंत पाटील यांचा भाजपला टोला

आमदारांच्या नाराजीवरून रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरु झालेय. या युद्धात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही उडी घेतलीय. आमचे आमदार सोबत आहेतच पण भाजप आमदारही आमच्या सरकारवर खुश असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Updated: Mar 19, 2022, 04:46 PM IST
मग आम्हीं काय येडे हाय का? जयंत पाटील यांचा भाजपला टोला title=

मुंबई : भाजप आमदार भाजपसोबत राहतील की नाही याची काहीच शाश्वती त्यांना नाही. त्यामुळेच भीती दाखवणे सुरु आहे. ते म्हणतात 25 आमदार बाहेर पडणार आहेत. मग आम्हीं काय येडे हाय का?असा जबरी टोला पाटील यांनी भाजपला लगावला.  

भाजपमध्ये गेलेला एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. राजीनामा द्यायचं आणि बाहेर पडायचं हे एवढं सोप्प नाही. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोकच 'सळो की पळो' करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार. त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही.

शिवसेनेचे अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी, 'सेनेच्या आमदारांना योग्य निधी मिळाल्याचं सांगितलंय. त्यामुळे चंद्रकांत दादा यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत. उलट भाजप आमदारच आमच्या सरकारवर खुश आहेत, असा दावा त्यांनी केलाय.

अजित पवार यांनी अर्थसंकल्पात भाजप आमदारांना मोठी रक्कम दिलीय. फडणवीस यांनी जितेक पैसे दिले त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही दिलेत. भाजप आमदारांचे तसे फोन आम्हाला येत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही. भाजपने आपल्या बुडाखाली काय जळतय ते पाहावं, अशी टीका त्यांनी केली.

किरीट सोमय्या यंत्रणा चालवतात. त्यामुळे त्यांना आधीच माहिती असते. कुणाचं काय पडणार हे त्यांना माहिती असणार. राजु शेट्टी यांचे मोदींबाबत काही आक्षेप होतें म्हणुन ते बाहेर पडले होते. त्यामुळे आता परत ते जातील असे वाटत नाही. त्यांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी लवकरच बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.