मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 17, 2024, 06:33 PM IST
मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच...   राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ title=

Lok Sabha Election 2024: राज्यात प्रचाराचा जोर वाढला आहे. अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबल उडाली आहे. तर,  भाजपमध्ये अवस्थता पसरली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. राहुल नार्वेकर यानी भायखळा येथे भाषण करताना हे वक्तव्य केले. राहुल नार्वेकर यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफना व्हायरल झाला आहे. 

भायखळा येथे राहुल नार्वेकर यांची प्रचार सभा

दक्षिण मुंबईतून महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. उमेदवारी जाहीर होण्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे.  राहुल नार्वेकर यांनी 14 एप्रिल रोजी त्यांनी भायखळ्यातील हेरीटेज हॉटेलमध्ये प्रचारसभा घेतली. या प्रचार सभेत  राहुल नार्वेकर यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या भाषणात म्हणाले. मी विधानसभा अध्यक्ष आहे माझे मला अधिकार माहिती आहेत. अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच अ. भा. सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल. अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय असं समजा या बहिणीला भावाची साथ निव्व्वळ लोकसभेसाठी नाहीतर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील असेही राहुल नार्वेकर म्हणाले. 

महायुतीत मुंबईतील तीन जागांचा पेच अजूनही कायम

महायुतीत मुंबईतील तीन जागांचा पेच अजूनही कायम आहे. दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य लोकसभा जागांवरील तिढा सुटला नाहीये. दक्षिण मुंबई लोकसभेवर भाजपसह शिवसेनेनं दावा केलाय. या जागेसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा तर शिवसेनेकडून यशवंत जाधव इच्छुक आहेत. उत्तर पश्चिममध्ये सध्या गजानन कीर्तिकर खासदार असले, तरी भाजपने दावा केलाय. माजी खासदार संजय निरुपम यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याचीही चर्चा सुरू आहे. उत्तर मध्य लोकसभेत खासदार पूनम महाजन यांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता आहे.