Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयिताला पुण्यात अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात सहभाग असलेल्या आरोपीला अटक  

Updated: Jun 8, 2022, 05:30 PM IST
Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयिताला पुण्यात अटक title=

Sidhu Moose Wala Pune Connection: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणात संशयीत असलेल्या एका आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ कांबळे उर्फ महाकाळ असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून मकोका खाली दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. 

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातही पोलीस सौरभची चौकशी करण्याची शक्यता आहे. 

मुसेवाला हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन समोर आलं होतं. या हल्ल्यात पुण्यातील संतोष जाधव आणि सौरभ कांबळे उर्फ महाकाल यांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ दोघेही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फरार आहेत

सुरक्षा काढून घेतल्यानंतर हत्या
पंजाब सरकराने सिद्धू मुसेवाला यांची सुरक्षा काढून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवसी त्यांची हत्या करण्यात आली. पंजाबच्या मानसा जिल्ह्यातील जवाहर के या त्यांच्या गावातून जीपमधून जात असताना त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली. 

सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यासाठी 8 शार्प शूटर्सला सुपारी देण्यात आली होती. यामधील पंजाबमधील तिघे जण, राजस्थानमधील तिघे जण आणि पुण्यातील दोन जणांचा समावेश होता.