ऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला; पुण्यातील तरुणाने फक्त 20 हजारासाठी लाखमोलाचा जीव गमावला

देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेले आहेत. अनेकांना मोबाईल गेमचे व्यसन लागले आहे. हेच मोबाईल गेमचे व्यसन त्यांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसत आहे. 

Updated: Jul 10, 2023, 06:15 PM IST
ऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला; पुण्यातील तरुणाने फक्त 20 हजारासाठी लाखमोलाचा जीव गमावला    title=

Pune Crime:  सध्या मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईलचे अनेक फायदे आहेत तसेच याचे तोटे देखील आहे. अनेक तरुण हे मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या ऑनलाईन गेमच्या आहारी गेले आहेत. पुण्यातील एक तरुण ऑनलाईन गेमच्या नादात आयुष्यातुन उठला आहे. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याच्या नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केली आहे. तळेगाव येथे घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

मावळ तालुक्यातील तळेगावात ही घटना घडली आहे. ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्याने तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गणेश काळदंते असं मृत तरुणाचे नाव आहे. गणेश मोबाईलवरील जंगलीरमी मध्ये 20 हजार रुपये हरला. याबाबत घरी काय उत्तर द्यायचं, या चिंतेतून त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं. 

ऑनलाईन गेमिंग मधून पैसा मिळविण्याच्या मोहात अनेक तरुणांचे नुकसान होत आहे. ऑनलाईन गेमचा नाद गणेशच्या जीवावर बेतला आहे. गणेश मोबाईलवरील जंगली रमी या खेळामध्ये वीस हजार रुपये हरला होता. आता ही बाब घरी समजली तर त्यांना काय उत्तर द्यायचं? असा प्रश्न त्याला सतावत होता. यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.  

गणेश कार चालक होता. त्याला अनेक व्यसन देखील होतं. त्यातच तो मोबाईलवर रमी खेळण्याचा नाद त्याला लागला होता. ड्रायव्हिंगचे काम करुन कमावलेले बहुतांश पैसे तो व्यसनावरच उडवत असायचा. विवाहित असलेला गणेश असा वाया गेल्याचं दिसून यायचे. त्यामुळं कुटुंबीय त्याच्यावर अनेकदा ओरडायचे. अशातच तो रमी मध्ये वीस हजार रुपये हरला. आता तर घरचे चांगलंच ओरडनार याच टेन्शनमध्ये त्याने रविवारच्या सायंकाळी गळफास घेत आत्महत्या केली. अशी माहिती कुटुंबीयांनी तळेगाव पोलिसांना दिली आहे.

ऑनलाईन गेमवर बंदी

देशात अनेक जण ऑनलाईन गेमिंगच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने तीन प्रकारच्या गेमवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली होती.