अरुण मेहेत्रे, झी २४ तास पुणे : पहाटे कोंबडा आरवणे हे तुम्हा आम्हाला सवयीचं आहे. पण पुण्यातल्या एका महिलेनं कोंबड्याच्या आरवण्यावर आक्षेप घेतलाय. या महिलेनं चक्क कोंबड्याच्या आरवण्याविरोधात पोलिसात धाव घेतली आहे.
पहाटे कोंबड्याच्या आरवण्यावर आतापर्यंत कुणाचा आक्षेप नव्हता. पण कोंबडा पुण्यातला असला तर गोष्ट वेगळी आहे बरं का?. पुण्यातल्या कोंबडे मालकांनी तर याची खबरदारी घ्यायला हवी. पुण्यातल्या एका महिलेनं शेजारच्याचा कोंबडा आरवण्यामुळे झोपमोड होत असल्याची तक्रार पोलिसांत केली. कोंबड्याचा बंदोबस्त करण्याची मागणी या महिलेनं केली आहे.
पोलिसांनी कोंबड्याचं हे प्रकरण महापालिकेच्या अखत्यारित असल्याचं सांगून स्वतःची सुटका करवून घेतली. व्हिओ--३-- कोंबड्याचं हे प्रकरण महापालिकेकडं गेलंय. आता महापालिका त्यावर काय निर्णय घेतं, यावर कोंबड्याच्या आरवण्याचं भवितव्य अवलंबून आहे.