पोलीस भरती लेखी परीक्षा, डमी देऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला अटक

Pune Police : राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या (State Reserve Police Force Police Recruitment)लेखी परीक्षेत गैरप्रकार उघड झाला होता. 

Updated: Jan 13, 2022, 10:50 AM IST
पोलीस भरती लेखी परीक्षा, डमी देऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला अटक title=
संग्रहित छाया

पुणे : Pune Police : राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या (State Reserve Police Force Police Recruitment)लेखी परीक्षेत गैरप्रकार उघड झाला होता. या पोलीस भरती परीक्षेसाठी चक्क डमी उमेदवार बसविण्यात आले होते. डमी उमेदवाराच्या माध्यमातून अनेक जण पोलीसमध्ये भरती झाले. अशाच एका भरती झालेल्या उमेदवाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

राज्य राखीव पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत डमी उमेदवाराला बसवून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम सुरेश सोनवणे (रा. औरंगाबाद) असे अटक केलेल्या उमेदवाराचे नाव आहे.

पोलीस भरतीच्या लेखी परीक्षासाठी विक्रम सुरेश सोनवणे यांने डमी उमेदवाराची मदत घेतली होती. या डमी उमेदवारावर गुन्हा दाखल  करण्यात आला होता. याप्रकरणी दौंड राज्य राखीव पोलीसच्या ग्रुप7 चे अधिकारी दत्तात्रय भोंगळे यांनी फिर्याद दिली होती. राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 19 या अहमदनगरमधील कुसडगाव येथील सशस्त्र पोलीस भरती प्रक्रिया 2099 चा विक्रम सोनवणे हा उमेदवार होता. 

दरम्यान, नागपूरमध्येही डमी उमेदवार बसविण्यात आले होते.  (Police Recruitment) पोलीस भरतीत नवीन माहिती पुढे आली होती. नागपूर शहर पोलीस भरतीत मूळ उमेदवार ऐवजी डमी उमेदवारांनकडून परीक्षा देऊन भरती प्रक्रियेत घोळ घातल्याप्रकरणी अजून 8 ते 10 उमेदवार  पोलिसांच्या रडारवर आहे. या पोलीस भरती रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर नागपूर गुन्हे शाखेने जयपाल कंकरवाल, अर्जुन सुलाने आणि तेजस जाधव या तीन आरोपींना अटक केलीय. याप्रकरणी पुढील काही दिवसात अजून काही आरोपींना अटकेची शक्यता आहे. 

इतर शासकीय विभागात हे रॅकेटने भरतीच्या करता सक्रिय होते का, याचा तपासही पोलीस करत आहेत. गेल्यावर्षी ऑक्टोबर नागपूर शहर पोलीस पदाची भरती घेण्यात आली. यावेळी संपूर्ण भरती प्रक्रिया व्हिडिओ शूटिंग आणि सीसीटीव्हीत चित्रित करण्यात आली होती..