Gram Panchayat Election : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला मोठा धक्का, स्वतःच्याच मतदारसंघात दारुण पराभव

राज्यभरात ग्राम पंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आहेत

Updated: Aug 5, 2022, 08:54 PM IST
Gram Panchayat Election : राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला मोठा धक्का, स्वतःच्याच मतदारसंघात दारुण पराभव title=

हेमंत चापुडे झी मिडीया, पुणे : पुणे (Pune) जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायत निवडणुकींचा (Gram Panchayat Election) सोमवारी जाहीर झाला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार पोपटराव गावडे यांना जोरदार धक्का बसला आहे. 

माजी आमदार गावडे यांच्या टाकळी हाजी गावातून विभक्त झालेल्या टाकळी हाजी गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचेच्या दामू घोडे यांनी बाजी मारली. दामू घोडे यांच्या पॅनेलने टाकळी हाजी मध्ये १६ - १ असा दणणणीत विजय मिळवला.

तर म्हसे बुद्रूकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचे ५ तर सर्वपक्षीय पुरस्कृत पॅनेलने २ जागांवर विजय मिळवला आहे. माळवाडीमध्ये सर्वपक्षीय पुरस्कृत ६ तर एका जागेवर अपक्षाने विजय मिळवला. सरदवाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ५ तर सर्वपक्षीय २ तर जांबूतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ६ आणि सर्वक्षीय ५ जणांचा विजय झाला आहे. तांदळीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस आणि शिवसेना पुरस्कृत पॅनेलने १० जागांवर दणदणीत विजय मिळवला असून भाजप पुरस्कृत पॅनलने एका जागेवर विजय मिळवला..

या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाला जोरदार धक्का बसला असून सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचे वर्चस्व पाहायला मिळाले. राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आमदार अशोक पवार यांचा मोठा विजय झाला. तर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना या ठिकाणी धक्का बसलाय.जांबुत टाकळी, हाजी सरदवाडी, माळवाडी, म्हसे तांदळी, या सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाचा बोलबाला पाहायला मिळाला.