Pune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं?

Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघातात नवीन अपडेट समोर आली आहे. तो भीषण अपघात पुणे पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा जीवंत केलाय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 12, 2024, 10:30 AM IST
Pune Porsche Accident : पुण्यातील 'तो' भीषण अपघात प्रसंग पुन्हा जीवंत; पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने नेमकं काय केलं? title=
Pune Porsche Acciden

Pune Porsche Accident : पुणे कल्याणीनगर पोर्श कार अपघात प्रकरणी दररोज नवीन नवीन अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील, आजोबा आणि आई हे गजाआड आहेत. पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामध्ये तीन ते चार गुन्हे घडले असल्याची बाब आता समोर आली आहे. आरोपीची कुटुंबाकडून कोर्टात नवीन नवीन खुलासे करण्यात येत आहे. अशात कोर्टात केस मजबूत स्थिती उभी करण्यासाठी पुणे पोलिसांनी तो भीषण अपघात पुन्हा एकदा जिवंत केलाय. 

कल्याणीनगर अपघात प्रकरणाची 'क्रॅश इम्पक्ट असेसमेंट'

 पुणे पोलिसांनी लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने कल्याणीनगर अपघात प्रकरणात 'क्रॅश इम्पक्ट असेसमेंट' (Crash Impact Assessment)  करण्यात आलं. यातून अपघात प्रसंगी नेमकं काय घडलं असेल?, दोन गाड्यांची टक्कर नेमकी कशी झाली असेल? मृतांना नेमका मार कसा बसला असेल? याचा अभ्यास करण्यात आला. अपघात ग्रस्त वाहने, मृत आणि त्यांच्या अंगावरील जखमा यांचा सांगड घालण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला.  'क्रॅश इम्पक्ट असेसमेंट' मधून अपघात नेमका कसा घडला असावा याविषयी यातून तंतोतंत अंदाज बांधण्यासाठी याची खूप मोठी मदत मिळाल्याच पुणे पोलिसांनी सांगितलं.

नेमकं काय केलं?

या अपघाताचा अंदाज येण्यासाठी अनिश आणि अश्विनी जात असलेल्या मोटारसायकलप्रमाणे गाडीची व्यवस्था करण्यात आली. त्या दोघांच्या शरीरयष्टीशी मिळतेजुळते व्यक्ती त्यावर बसवले. त्यानंतर या अपघाताचा प्रसंग पुन्हा उभा केला. या प्रसंगात पोलिसांनी उभ्या केलेल्या व्यक्तींना झालेल्या जखमा, गाडीचे झालेले नुकसान, धडक झाली तेव्हा त्याचा दोन्ही वाहनांवर पडलेला प्रभाव यांचा प्रत्यक्ष अपघातात जीव गेलेल्या, अपघातामधील वाहनांची स्थिती आणि पोलिसांनी तयार केलेल्या प्रसंगातील वाहनांची स्थिती यांचा तुलनात्मक अभ्यासातून करण्यात आली. या ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’मध्ये अपघाताविषयी अत्यंत महत्वपूर्ण अहवाल पोलिसांच्या हाती मिळाला आहे. 

कल्याणीनगरचा अपघात नेमका कसा घडला असावा याविषयी वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास पुणे पोलिसांकडून करण्यात येतोय. प्रसंगाचे सीसीटीव्ही नसल्याने तो प्रसंग विविध पद्धतीने जीवंत करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. तपासाचा भाग म्हणून हा प्रसंग समजून घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत पोलिसांनी घेतली आहे. ‘आर्टिफिशल इंटेलिजेन्स’चा वापर करून अपघाताचा प्रसंग उभा केला. वाहनांचा वेग, त्यांची झालेली धडक, मृत असा सर्व प्रसंग ‘एआय’च्या माध्यमातून तपासला केला जात आहे. 

अपघात घडला तेव्हा पाठीमागे बसलेली अश्विनी साधारणपणे 20-25 फुट उंच उडून ती सुरुवातीला पोर्शे कारच्या काचेवर आदळली आणि त्यानंतर ती रस्त्यावर खाली आपटली. या अपघातात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने केलेल्या ‘क्रॅश इम्पॅक्ट असेसमेंट’मध्ये हे समोर आल आहे.