Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट

Murlidhar Mohol Met Medha kulkarni : पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

सौरभ तळेकर | Updated: Mar 16, 2024, 10:32 PM IST
Pune LokSabha : मुरलीधर मोहोळ यांच्याकडून बेरजेचं गणित, प्रचाराचा नारळ फोडताच घेतली मेधा कुलकर्णींची स्नेहभेट title=
Pune Politics Murlidhar Mohol Met Medha kulkarni

Pune Lok Sabha constituency : भाजपने काही दिवसांपूर्वी लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केल्याचं दिसून आलं. पुण्यातून दिग्गज नेते मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी दिली अन् भाजपने हुकमी एक्का (Pune Lok Sabha) मैदानात उतरवला. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची ख्याती गेल्या काही वर्षांपासून चांगलीच प्रचलित झाली. पुणेकरांचे लाडके मुरलीधर अण्णा यांनी आता बेरजेचं समीकरण सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी पक्षांतर्गत विरोध झेलणाऱ्या नेत्यांची भेटीगाठी घेतल्या आहेत. मोहोळ यांनी नुकत्यात राज्यसभा खासदार झालेल्या मेधा कुलकर्णी (Murlidhar Mohol Met Medha kulkarni) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता पुण्याच्या राजकारणात अनेकांच्या भूवया उंचावल्याचं पहायला मिळतंय.

कोथरूडच्या माजी आमदार आणि विद्यमान राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील छुपा संघर्ष पुणेकरांना माहितच आहे. गेल्या 10 वर्षांपासून भाजपमधील अंतर्गत कलह सर्वश्रृत आहे. अशातच मुरलीधर मोहोळ यांनी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली होती. यावेळी मोहोळ यांच्यासोबत महायुतीतील पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी उपस्थित होते.मात्र खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपकडून इच्छुक असलेले जगदीश मुळीक हे अनुपस्थित होते. त्यामुळे आता भाजपला याचा मोठा फटका बसणार का? असा सवाल विचारला जात होता. अशातच आता मुरलीधर मोहोळ यांनी समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. 

मुरलीधर मोहोळ यांनी जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लगोलग मेधा कुलकर्णी यांच्या घरी जाऊल, सदिच्छा भेट घेतली. मेधा कुलकर्णी यांनी भारतीय संस्कृतीचं प्रतिक असणारं औक्षण करुन स्वागत केलं. भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध विषयांवर संवाद झाल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

पुण्यातील भाजपचं गणित

कसबा पोटनिवडणूक भाजपला मोठा धक्का बसल्याने भाजपने मुरलीधर मोहोळ यांच्या रुपात मराठा चेहरा तयार ठेवला होता. ब्राम्हण समाज नाराज होऊ नये यासाठी धीरज घाटे यांची शहराध्यक्षपदी निवड केली तर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवल्यानंतर भाजपने पुण्यात प्लॅन बी अॅक्टिव केला अन् मुरलीधर मोहोळ यांना तिकीट दिलंय.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

पुणे महानगरपालिकेचा सभासद म्हणून चार वेळा विजयी 2002, 2007, 2012 आणि 2017 झाले आहेत. 2019- 2022 मध्ये पुणे महानगर पालिकेचे महापौर होते. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामांचं कौतूक देखील झालं होतं. अखिल भारतीय महापौर परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत. 2017 मध्ये पुणे महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष देखील होते. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) च्या संचालकपदाचा कारभार देखील त्यांनी हाकला आहे. मुरलीधर मोहोळ यांचा दांडगा जनसंपर्क आहे आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांच्या सक्रिय सहभाग होता.