कडक सॅल्युट | सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोधलं चोरीला गेलेलं बाळ

कोणाला संशय येऊ नये म्हणून ही महिला चक्क नर्सच्या वेशात आली होती.   

Updated: Sep 10, 2021, 10:41 PM IST
कडक सॅल्युट | सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी शोधलं चोरीला गेलेलं बाळ title=

पुणे : पुण्यात (Pune) एका महिलेने हॉस्पीटलमधून बाळाची चोरी (Robbery Of Child) केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. हा सर्व प्रकार ससून हॉस्पिटलमध्ये (Sasun Hospital) घडला. ही चोरटी महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली. पोलिसांच्या (Pune Police) तत्परतमुळे हे बाळ सुखरुप मिळालं. तसेच पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या पतीला अटक केली आहे. (pune Police Arrested Women Who Stole Newborn Baby From sasun Hospital)  
 
नक्की काय झालं?

कोणाला संशय येऊ नये म्हणून ही महिला चक्क नर्सच्या वेशात आली होती. त्यानंतर ठरवल्यानुसार या महिलेनं त्या बाळाला घेऊन पोबारा केला. या चिमुरड्याचं वय अवघे 3 महिने इतकं होतं. आपलं मुल कुठेही दिसत नसल्याने त्या आईने एकच आरडाओरडा केला. त्यानंतर हॉस्पिटमधून बाळ चोरीला गेल्याचं समजलं. रुग्णालय प्रशासनाची पाचावर धारण झाली. मात्र रुग्णालयाच असलेल्या सीसीटीव्हीमुळे या महिलेचा सर्व प्रकार फसला. या महिलेचा सर्व प्रताप हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चक्र फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये त्या महिलेला अटक केली. तसेच 3 महिन्यांचं बाळही सुखरुप आहे. 

बाळ चोरी करण्याचं कारण काय? 

अनेकदा रुग्णालयातून किंवा कुठूनही बाळ चोरल्याच्या घटना घडतात. मात्र यामागे उद्देश वेगळा असतो. या महिलेचाही उद्देश वेगळा होता. या महिलेला मूल होत नव्हतं. त्यामुळे या महिलेने हा कारनामा केल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. मात्र असं असलं तरी, या निमित्ताने ससून रुग्णालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय.