Pune Crime : पुण्यातील किरकटवाडीत बेकायदेशीर रित्या अफू शेती करणाऱ्या शेतावर पोलिसांनी धाड टाकली. शेतांमध्ये अफूची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक म्हणजे कोणाला कळू नयेत कांदा पिकामध्ये अफूची लागवड करण्यात आली होती. पोलिसांनी छापा मारल्यानंतर शेतात 14.450 किलो ग्रॅम वजनाची अफूची बोंडे आढळून आली. या शेतामध्ये जवळपास 1178 झाडं असल्याने नोंद करण्यात आली असून या अफूची मार्केटमध्ये साधारण 28,700 रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. (pune police arrested farmer for Cultivation of opium in onion farm Pune Crime news in marathi)
विना परवाना अफूची लागवड केल्यामुळे हवेली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तानाजी शांताराम हगवणे आणि शिवाजी बबन हगवणे असं ताब्यात घेतलेल्या तरुणांचं नाव आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे इथेही बेकायदेशीर रित्या अफू शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पोलिसांनी शेतकऱ्याला अटक केली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे शेटफळगढे गावच्या हद्दीत जमीनगट क्रमांक. 65 मध्ये रामदास किसन वाबळे या शेतकऱ्याने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीर रित्या अफू झाडांची लागवड केली होती. या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून 163 किलो 900 ग्रॅम वजनाची अफूची झाडं ज्यांची किंमत साधारण 3,24,800/- किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. एन.डी.पी.एस अॅक्ट नुसार या शेतकऱ्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.