Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी

Jitendra Awad judicial custody : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Updated: Nov 12, 2022, 11:04 PM IST
Jitendra Awhad: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना न्यायालयीन कोठडी title=

NCP Leader Jitendra Awhad Arrest  : छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाच्या (Har Har Mahadev Movie) प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody ) सुनावली आहे. त्यामुळे आव्हाड यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) त्यांनी लगेच जामीनासाठी अर्जही केला आहे.

 जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती.  त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात रात्र काढावी लागली होती. आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले.  (Jitendra Awhad arrested for disrupting screening of Marathi film ‘Har Har Mahadev’ on Chhatrapati Shivaji Maharaj) ‘हर हर महादेव’(Har Har Mahadev Movie) या मराठी सिनेमाच्या वादावरुन ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमध्ये राडा केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना  काल अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांना अटक केली आहे. 

आज सकाळी वर्तकनगर पोलीस स्टेशनमधून पोलीस त्यांना घेऊन न्यायालयाकडे दाखल झाले होते. आव्हाडांच्या पोलीस कस्टडीची पोलिसांनी मागणी करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.  दरम्यान आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलीस स्टेशन आणि न्यायालय परिसरात गर्दी झाली केली आहे. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. 

आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान आव्हाडांना कोर्टात हजर केलं गेल होतं. काल आव्हाडांची ठाणे जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची रवानगी वर्तकनगर पोलीस स्टेशनला करण्यात आली. आज आव्हाडांना जामीन मिळतो की त्यांची कोठडी वाढते याची उत्सुकता होती.