'म्हणून सर्जिकल स्ट्राईकवेळी बिबळ्याची विष्ठा-मूत्र घेऊन गेलो'

सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी संभाव्य धोक्यांचा किती बारकाईनं विचार केला होता याची रंजक माहिती निवृत्त लेफ्टनंट राजेंद्र निंभोरकर यांनी दिली. 

Updated: Sep 12, 2018, 09:42 PM IST
'म्हणून सर्जिकल स्ट्राईकवेळी बिबळ्याची विष्ठा-मूत्र घेऊन गेलो' title=

पुणे : सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी संभाव्य धोक्यांचा किती बारकाईनं विचार केला होता याची रंजक माहिती निवृत्त लेफ्टनंट राजेंद्र निंभोरकर यांनी दिली. निंभोरकर यांना पुण्यात थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.  शत्रुच्या हद्दीत गेल्यानंतर तिकडचे कुत्रे भुंकले असते तरी शत्रु सावध झाला असता. अशावेळी कुत्रे कसे भुंकले नाहीत, याचा किस्सा निंभोरकर यांनी या कार्यक्रमात सांगितला.

सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी तिथल्या गावांमध्ये कुत्रा भुंकण्याची भिती होती. कुत्रे भुंकले असते तर शत्रू सावध झाला असता. बिबळे कुत्र्यांना भक्ष बनवतात म्हणून कुत्रे बिबळ्यांना घाबरून असतात, त्यामुळे आम्ही बिबळ्याची विष्ठा आणि मूत्र सोबत नेलं होतं. बिबळ्याची विष्ठा आणि मूत्र असल्यामुळे सर्जिकल स्ट्राईकच्यावेळी कुत्री भुंकली नाहीत, असं निंभोरकर म्हणाले.