पुण्यात मायलेकींचे मृतदेह धक्कादायक स्थितीत सापडले, पतीला पोलिसांनी ताब्यात घेताच...

Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येतेय. राहत्या घरात माय-लेकीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जावेद मुलाणी | Updated: Oct 20, 2023, 06:21 PM IST
पुण्यात मायलेकींचे मृतदेह धक्कादायक स्थितीत सापडले, पतीला पोलिसांनी ताब्यात घेताच...  title=
pune news today Mother and daughter found dead in home indapur

जावेद मुलानी, झी मीडिया

Pune News Today: इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकींचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात दोघी मृतावस्थेत आढळल्या आहेत. ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत.  दरम्यान, पती सागरला पोलिस घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला मारहाण केल्याचा प्रकारही घडला आहे. (Pune Crime News)

इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अश्विनी सागर म्हस्के वय २८ वर्ष व सानवी सागर म्हस्के वय ४ वर्षी अशी मृतांची नावे आहेत. आज शनिवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास या दोघींचे मृतदेह राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघींचे मृतदेह उतरवण्यात आले आहेत. मात्र, ही आत्महत्या की हत्त्या याचा शोध वालचंदनगर पोलीस घेत आहेत.

दरम्यान, वालचंदनगर पोलीसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या त्याच्यावर संशय असून त्याला ताब्यात घेऊन जात असताना संतप्त नातेवाईकांना सागर म्हस्के याला चांगलाच चोप दिल्याचा प्रकार घडला आहे. मात्र, सतर्क असलेल्या पोलिसांनी कशीबशी त्याची जमावाकडून सुटका करुन त्याला गाडीत बसवले व पोलिस ठाण्यात नेले.

माय-लेकीच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेने हगारेवाडी परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. तसंच, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. 

अकोल्यात आरोपीला अटक 

अकोला शहरातील नामवंत व्यवसायिक किशोर खत्री हत्याकांडातील फरार आरोपी जसवंतसिंग चौव्हान उर्फ जससीला अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. जससी हा पोलीस कर्मचारी होता त्याने किशोर खत्री यांच्या हत्येत साथ दिली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. 

मात्र कोविडची लागण झाल्याने त्याला पेरोलवर सोडण्यात आलं होतं. तेव्हापासून तो फरार झाला होता. स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने जससीला दोन वर्षानंतर मध्यप्रदेशच्या बुऱ्हाणपूर येथून अटक केली आहेय.