कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी-चिंचवड: उंदीर-मांजर, साप-उंदीर, ससा-कासव (sasa kasav gostha) यांच्या गोष्टी आपण लहानपणी ऐकल्या असतीलच. लहानपणी त्यांच्या गोष्टी ऐकायला आपल्याला कोण अप्रुप वाटायचं. साप आणि उंदीराची पळापळ आपण नेहमीच पाहत आलो आहोत. त्यामुळे त्यांच्यावर बातम्या आणि व्हिडीओ नुफान (snake and mice videos) व्हायरल होत असतात. त्यातच आता भर म्हणून अशीच एक वेगळी आणि इंटरेरिस्टींग बातमी (interesting news) समोर आली आहे. चक्क सापाला 163 रूपयांचा पांढराशुभ्र उंदीर खायला (white mice for snakes in food) मिळणार आहे. सध्या या बातमीनं सगळेच आवक (shocking news) झाले आहे. ही बातमी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. (pune news snakes will get 163 rupees white mice as food municipality invests money)
मोलमजुरी करून जगणारा वर्ग 10 रुपयांची शिव भोजन थाळी खातो पण या वर्गापेक्षा पिंपरी-चिंचवड मधल्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील साप अधिक भाग्यवान आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना 163 रुपयांचा एक पांढरा उंदीर खायला मिळणार आहे. प्राणिसंग्रहालयात विविध प्रजातींचे 180 साप (snakes) आहेत. उंदीर पुरवताना पुरवठा दाराला अनेक अति 5 शर्तींचे पालनही करावे लागणार आहे. उंदरामुळे सापांना काही त्रास झाल्यास अथवा विषबाधा झाल्यास त्याला ठेकेदार जबाबदार राहणार आहे. एवढेच नाही तर त्यांचा दर्जा योग्य नसल्यास त्याला 500 रुपये दंड ही ठोटावण्यात येणार आहे.
सापांना दोन वर्षे पांढरे उंदीर पुरवण्यासाठी पशु वैद्यकीय विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली. त्याला तीन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. त्यातील सॅम इंटरप्रायजेस यांनी 165 ऐवजी 163 रुपयांना पांढरे उंदीर पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार पुढचे दोन वर्षे त्याच्या कडून 7 हजार 200 पांढरे उंदीर खरेदी केली जाणार आहेत. त्यासाठी महापालिका 11 लाख 73 हजार 600 रुपये मोजणार आहेत. एका सापाला आठवड्यातून दोन उंदीर खायला दिले जाणार आहेत. त्यासाठी पालिकेचे प्राणी संग्रहालयातील कर्मचारी विशेष लक्ष देणार आहेत.
खरे तर उंदरांचा त्रास नको म्हणून अनेकजण घरात उपाययोजना करतात. उंदीर एवढे सहज उपलब्ध असताना त्यांना 163 रुपये का असा प्रश्न साहजिकच उपस्तिथ झालाय. मात्र सापळा उंदीर खायला देताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. सापाला जो उंदीर पुरवला जाणार आहे त्याची ही विशेष काळजी घ्यावी लागते. त्याला ही कोणता आजार, त्रास नाही ना याची सातत्याने तपासणी करावी लागते. तो खाल्याने सापाला त्रास होणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी लागते. त्यासाठी त्याला देण्यात येणारे खाद्य, वारंवार वैद्यकीय तपासणी (medical test) या सर्व गोष्टी मुळे उंदीर एवढा खर्चिक होत असल्याचे पशु वैद्यकीय विभागाने स्पष्ट केलंय. अर्थात या उंदरांची विशेष काळजी घेतली जात असेल यात तथ्य असले तरी 163 रुपयांचा एक उंदीर खाणारे साप भाग्यवान म्हणावे लागतील हे मात्र तितकेच खरे.