शेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती

Viral News : महिंद्राच्या थार या ऑफ-रोड गाडीने सर्वांनाच वेड लावलं आहे. पुण्यात एका शेतकऱ्याने चक्क साडेबारा लाखांच्या थार गाडीने शेत नांगरलं आहे. या नांगरणीसाठी जास्त खर्च आला असली तरी गाडीविषयी समाधानी असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

आकाश नेटके | Updated: Jun 13, 2023, 10:37 AM IST
शेतीसाठी काय पण...! 12.50 लाखांच्या गाडीने नांगरली शेती title=

Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्धीसाठी लोक काही करण्यास तयार असतात. मग ते मेट्रोत किंवा भररस्त्यात नाचणं असो की एखाद्या पदार्थात दुसरा पदार्थ घालून नवं काहीतरी तयार करणं असो. पण काही लोकं अशीही असतात ज्यांच त्यांच्याजवळ असलेल्या गोष्टींवर जीवापाड प्रेम असतं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांना दाखवलंही जातं. अशाच एका शेतकरी पठ्ठ्याने चक्क साडेबारा लाखाच्या गाडीने आपलं सगळं शेत (Farm) नांगरलं आहे. या नांगरणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. 

पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने चक्क महिंद्रा थार या गाडीने शेती नांगरल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्याच्या या अनोख्या नांगरणीची सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होतेय. राज्यात सध्या मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेला शेतकरी शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे. यामध्ये नांगरीसारखी महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करण्याचे त्याचे प्रयत्न सुरु आहेत. या नांगरणीसाठी कोणी बैलजोडी तर कोणी ट्रॅक्टरचा वापर करत आहे. पण इंदापूरच्या लोणी देवकर येथील य शेतकऱ्याने थार गाडीने शेती नांगरली आहे. अनिल मधुकर तोंडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सध्या तरुणाईमध्ये महिंद्रा थार या ऑफ-रोड गाडीचं मोठं आकर्षण आहे. महिंद्रा अँड महिंद्राने भारतीय बाजारपेठेत थारची मोठी मागणी आहे. अनेक गाड्यांसोबत महिद्रा थार ही सध्या बाजारात स्पर्धा करतेय. अशातच अनिल तोंडे या शेतकऱ्याने थेट शेतीच्या कामातच महिंद्रा थार गाडीचा उपयोग केला आहे.

अनिल तोंडे या युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरणीसाठी थार गाडीचा उपयोग केल्याने सध्या चांगलीच चर्चा सुरु झालीय.अनिल तोंडे यांनी या गाडीने तब्बल एक दोन सऱ्या नव्हे तर जवळपास एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या साह्याने नांगरले आहे. "थार गाडीला मागील बाजूस नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरणी केली आहे. या दणकट गाडीच्या सहाय्याने आपण शेती नांगरट करून पाहूया असा विचार मनात आल्याने जवळपास एक एकर क्षेत्राची नांगरणी करून पाहिली. ट्रॅक्टरच्या तुलनेत गाडीने नांगरणी करण्यास अधिकचा खर्च आला पण गाडीची कार्यक्षमता पडताळली असता गाडी दणकट आहे. त्यामुळे मी गाडी विषयी समाधानी आहे," असे तोंडे यांनी म्हटलं आहे.

कुस्तीत बक्षीस म्हणून दिली जातेय थार

दरम्यान, थार गाडी खरेदी करण्यासाठी तब्बल एक वर्षाहून अधिकचा काळ वाट पाहावी लागत आहे. तेव्हा कुठेही गाडी खरेदीदाराला मिळते. कुस्तीच्या सामन्यांमध्ये देखील पैलवानांना थार गाडीची खास भेट दिली जात आहे. सर्वसामान्यांपासून  अनेकजण थार घाडीला पसंती देताना दिसत आहेत.