पुण्यात २०१९ पर्यंत मेट्रो धावेल- पंतप्रधान मोदी

मोदींच्या हस्ते पुण्याच्या मेट्रो तीनचं भूमीपूजन

Updated: Dec 18, 2018, 06:47 PM IST
पुण्यात २०१९ पर्यंत मेट्रो धावेल- पंतप्रधान मोदी title=

पुणे : पुण्यात २०१९ पर्यंत मेट्रो धावेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात व्यक्त केला आहे. मोदींच्या हस्ते पुण्याच्या मेट्रो तीनचं भूमीपूजन करण्यात आलं. हिंजवडी ते शिवाजीनगर असा हा मेट्रो मार्ग असणार आहे. बालेवाडी संकुलात झालेल्या या कार्यक्रमात मोदींचं पुणेरी पगडी देऊन स्वागत केलं. पुण्यातल्या भाषणाची सुरुवातही मोदींनी मराठीतून केली.

विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जन्मभूमी असा उल्लेख मोदींनी भाषणात केला. मेट्रो ही आता लाईफलाईन झाली आहे. देशात ८०० किलोमीटर मेट्रो मार्गाची कामं सुरू असल्याचं मोदींनी सांगितलं. मेट्रो तीन मुळे पुण्यात वाहतुकीची कोंडी कमी होईल आणि आयटी कर्मचाऱ्यांना या मेट्रोचा लाभ होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.