पुण्यात गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म

जगभरात आतापर्यंत प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे. 

Updated: Oct 18, 2018, 01:58 PM IST
पुण्यात गर्भाशयाच्या प्रत्यारोपणातून मुलीचा जन्म  title=

मुंबई : प्रत्यारोपण केलेल्या गर्भाशयातून देशातील पहिल्या मुलीचा जन्म पुण्यातील गॅलॅक्सी केअर हास्पिटलमध्ये झाला.  देशाच्या वैद्यकीय इतिहासातील ही क्रांतिकारी घटना पुण्यात घडलीये. जगभरात आतापर्यंत प्रत्यारोपित केलेल्या गर्भाशयातून ११ बाळांचा जन्म झाला आहे.

पुण्यातलं १२ वं बाळ

पुण्यात जन्मलेले हे १२ वे बाळ आहे. मे 2017 मध्ये सोलापूर  इथल्या एका महिलेला तीच्या आईने गर्भाशय दान केलं होतं.

त्यानंतर आयव्हीएफच्या माध्यमातून तीला गर्भधारणा झाली. आज प्रत़्यारोपणानंतर दीड वर्षानी  दस-याच्या दिवशी रात्री 12 वाजून 12 मिनीटांनी हे बाळ जन्माला आलं.

या बाळाचं वजन 1450 ग्रॅम एवढं आहे. बाळ आणि आईची प्रकृती उत्तम असल्याचं गँलँक्सी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलंय.