पुणे : कोरोनाची लस तयार करून देशाला नवसंजीवनी देणारी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी दुर्घटना समोर आली आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठी आग लागली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. या आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली आहे.
सीरमच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली असून ती पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Maharashtra: Fire breaks out at Terminal 1 gate of Serum Institute of India in Pune. More details awaited. pic.twitter.com/RnjnNj37ta
— ANI (@ANI) January 21, 2021
पुण्यातील सीरमने तयार केली कोरोनावर लस
कोरोनाची लस तयार करण्यात सीरम संस्थेचा मोठा वाटा आता. कोव्हिशील्ड लस ही सीरममध्ये तयार करण्यात आली आहे. देशातील अनेक भागांमध्ये सध्या कोव्हिशील्ड लसीच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे.