पुण्यातलं हे अपहरण प्रकरण स्पर्धां परीक्षांचा प्रश्न ठरु शकतं इतकं कॉम्पलिकेटेड; 6 जणांच्या अटकेनंतर खुलासा

Pune Crime : पुण्यातील डॉक्टरच्या अपहरण प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी विभक्त पत्नीसह सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. आरोपींनी डॉक्टरचे अपहरण करुन त्याला मारहाण करुन घरातून तब्बल 27 लाखांची रक्कम पळवली होती.

आकाश नेटके | Updated: Aug 25, 2023, 11:40 AM IST
पुण्यातलं हे अपहरण प्रकरण स्पर्धां परीक्षांचा प्रश्न ठरु शकतं इतकं कॉम्पलिकेटेड; 6 जणांच्या अटकेनंतर खुलासा title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune Crime) पशुवैद्यकीय डॉक्टरच्या किचकट अपरहण प्रकरणातील सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांकडून (Pune Police) अखेर अटक करण्यात आली आहे. फुरसुंगी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरच्या अपहरण (Abduction) प्रकरणात त्याची विभक्त पत्नी, पहिल्या पत्नीची धाकटी भावजय व भावजयीचा प्रियकर यांनी मिळून अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले आहे. पतीच्या अपहरणानंतर त्याची हत्या करण्याचा कट पत्नीने आखला होता. मात्र पतीने अपहरकर्त्यांना पैसे देऊन आपली सुटका करुन घेतली होती. मात्र आता या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहे.

लोणी काळभोर (पुणे)- भेकराईनगर येथील डॉक्टरचे त्याची पहिली पत्नी, पहिल्या पत्नीची धाकटी भावजय व भावजयीचा प्रियकर यांनी मिळून अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी डॉक्टरकडून 27 लाखांची खंडणी उकळली होती. एखाद्या बॉलिवुड थ्रीलर चित्रपटालाही लाजवेल असे कथानक असलेल्या या किचकट गुन्हाचा तपास करुन एक महिला, एक तृतीयपंथी आणि चार तरुण अशा सहा आरोपींना लोणी काळभोर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

राहुल दत्तु निकम (वय 27, रा. मु. पो. शहा, ता. इंदापुर, जि. पुणे) हा या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. लोणी काळभोर पोलिसांनी राहुल निकम, त्याची प्रेयसी विदया नितीन खळदकर (वय 35, रा. ढगेमळा, कुर्डुवाडी रोड, ता. बार्शी जि. सोलापुर) हिच्यासह राहुलचे सहकारी माऊली ऊर्फ ज्ञानदेव महादेव क्षीरसागर, नितीन बाळु जाधव, सुहास साधु मारकड, संतोष धोंडीबा गोंजारी ऊर्फ राणी पाटील या सहा जनांना मोठ्या शिताफिने अटक केली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली काही वाहने, तक्रारदार डॉक्टरचा आणि आरोपींचे मोबाईल, सोन्याचे दागिने, बारा लाख रुपये रोख रक्कम असा एकूण 22,55,00 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

डॉ. प्रदीप मारुती जाधव असे अपहरण झालेल्या फुरसुंगी येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. श्वान आजारी असल्याचा बहाण्याने आरोपींनी नियोजन करुन डॉक्टर प्रदीप जाधव यांचे वडकी येथुन 9 ऑगष्ट रोजी अपहरण केले होते. अपहरणानंतर प्रदीप यांना एका नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी गाडीत जबरदस्तीने बसवून एका ठिकाणी नेले आणि मारहाण केली. मारहाणी दरम्यान डॉक्टरल तुमच्या पत्नीने व मेहुण्याने तुम्हाला मारण्याची सुपारी दिली असल्याचे खोटे कथानक ऐकवले होते.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रदीप जाधव यांना दोन पत्नी असून त्यांनी पहिल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिलेली आहे. पहिल्या पत्नीला न्यायालयाने प्रदीप यांना पंचविस लाख रुपयांची एकरकमी पोटगी देण्याचे आदेश दिले होते. ही रक्कम देण्यासाठी डॉक्टरांनी घरी रोख रक्कम आणली होती. दरम्यान ही रक्कम देण्यासाठी प्रदीप यांनी पहिल्या पत्नीला संपर्क साधला. त्यावेळी प्रदीप यांची विभक्त पत्नी बार्शी येथे होती. विभक्त पत्नीने ही बाब तिच्या माहेरच्या लोकांच्या बरोबर, तिची भावजय विद्या नितीन खळदकर हिला सुद्धा सांगितले.

विद्याचे राहुल निकम याच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध सुरु होते. विद्याला पतीला सोडून राहुलबरोबर संसार करायचा होता. पण पैशांची अडचन असल्याने राहुल तिला टाळत होता. विद्याने प्रदीप जाधवच्या घरात पंचवीस लाख रुपयांची रक्कम असल्याची माहिती देताच, राहुल व विद्याने त्याचे अपहरण करण्याचे ठरवले. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने प्रदीप यांचे अपहरण करण्यात आले पैसे काढून घेतले. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलि्स उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या कौशल्यामुळे व पोलीस अंमलदार संभाजी देवीकर, श्रीनाथ जाधव, बाजीराव वीर व शैलेश कुदळे यांचे सहाय्याने तांत्रिक विश्लेषणामुळे वरील आरोपींना अटक करण्यात यश मिळवता आले आहे.