Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!

Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.

Updated: Oct 1, 2023, 04:15 PM IST
Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त! title=
Drug racket, Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात ड्रग्जचे मोठे रॅकेट चालविले जात आहे. बक्कळ पैसा मिळत असल्याने अनेक तरूण या रॅकेटमध्ये सहभागी होत आहेत. यातीलच एक म्हणजे ललित पटेल. त्याने उपचार घेण्याच्या नावाखाली ससून रुग्णालयात दाखल झाला खरा मात्र, तेथूनही तो ड्रग्जचे रॅकेट चालवत होता. मात्र, यावेळी पुणे गुन्हे विभागाच्या पोलिसांनी त्याचा हा डाव उधळून लावला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे पुण्यात नेमकं काय? असा सवाल विचारला जातोय.

शहरात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. सुमारे 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहे. MD म्हणजेच या मेफिड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 2 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, ससून रुग्णालय परिसरात हे ड्रग्ज आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मेफिड्रोनप्रकरणी हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. सध्या वैद्यकीय उपचारासाठी त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयात भरती असताना सुद्धा त्याने हे रॅकेट चालवले कसं? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीचे मोठे जाळे तयार झाल्याचे पोलीस कारवायातून समोर आले आहे. मात्र अटकेत असलेल्या ललित पटेल नावाच्या कुख्यात ड्रग्ज तस्कराने वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली चक्क रुग्णालयातून ड्रग्ज रॅकेट चालविल्याने आता या घटनेतून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. 

आणखी वाचा - Maharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!

दरम्यान, ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का? येथील स्टाफचा संबंध आहे का? या अनुषंगाने देखील पोलीस तपास सुरू आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिलीये. एकीकडे पुणे ड्रग्जच्या विळख्यात अडकत असताना दुसरीकडे रायगडमध्ये देखील स्वच्छता मोहीम दरम्यान चरसची पाकिटे सापडली आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. अलिबागच्या वरसोली समुद्रकिनारी १० पाकिटे सापडली. गांधी जयंती निमित्त रायगड जिल्हा परिषदे मार्फत स्वच्छता अभियान सुरू होतं. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची वरसोली किनारी भेट दिली. त्यानंतर सापडलेली पाकिटे पोलिसांकडे सुपूर्द केली गेली आहेत.