MPSC परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिची हत्याच, फरार मित्र राहुल हांडोरेने घरच्यांना फोन करत सांगितलं...

नुकतीच MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये दर्शनाची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं असून तिचा मित्र घटनेच्या दिवसापासून फरार आहे. पोलिसांना त्याच्यावरच संशय असून त्याच्या शोधासाठी पाच पथकं नेमली आहेत.   

निलेश खरमारे | Updated: Jun 20, 2023, 10:03 PM IST
MPSC परीक्षा उत्तीर्ण दर्शना पवार हिची हत्याच,  फरार मित्र राहुल हांडोरेने घरच्यांना फोन करत सांगितलं...  title=

निलेश खरमारे, झी मीडिया, पुणे :  MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार या तरुणीच्या मृतदेह (Darshana Pawar Murder Case) पुण्यातील राजगड किल्ल्याच्या (Rajgadh Fort) पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या नंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये (Postmortem Report) दर्शन पवारची हत्याच झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तिच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. 

काय आहे नेमकं प्रकरण?
गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या आणि नुकतीच MPSC ची परीक्षा पास होऊन वनखात्यात RFO अधिकारी म्हणून निवड झालेल्या दर्शना पवार हिचा 18 जूनला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी मृतदेह आढळला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. मूळची नगर जिल्ह्यातील कोपरगाव इथली दर्शना पवार MPSC परीक्षा पास झाल्यानंतर सत्कार समारंभासाठी 9 जूनला पुण्यातील स्पॉट लाईट अॅकॅडमी इथं आली होती. त्यानंतर 12 जूनला दर्शना आणि तिचा मित्र राहुल हांडोरे (Rahul Handore) हे ट्रेकिंगसाठी राजगड किल्ल्यावर आले होते. पण त्यादिवसानंतर दर्शना आणि राहुल यांच्याशी संपर्क झाला न्हवता. 

अखेर तीच्या घरच्यांकडून 15 जूनला पुण्यातील सिंहगड रोडच्या नऱ्हे पोलीस स्टेशन मध्ये ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती त्यानंतर 18 जूनला राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी दर्शनाचा थेट मृतदेहचं आढळला.  वेल्हा पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. 12 जूनला दर्शना सोबत ट्रेकिंगसाठी आलेला तीचा मित्र राहुल हा देखील गायब असल्याचे तपासात उघड झालं आहे. त्याचबरोबर घटनेनंतर तपासलेल्या cctv तही दुचाकीवर दोघेही राजगडच्या दिशेने येताना दिसत आहे. मात्र जाताना राहुल एकटाच पुण्याच्या दिशेने परताना दिसतोय. सीसीटीव्ही बाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असला तरी यामुळे पोलिसांचा मित्रावर संशय अधिक बळावला आहे. त्यामुळं या घटनेत राहुल हाच मुख्य आरोपी आहे की आणखी दर्शनाची हत्या केली याचा शोध लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे

राहुल हांडोरेचा फोन
दरम्यान यात आणखी एक घटना समोर आली आहे. फरार असलेला राहुल हांडोरे हा महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेल्याचं समोर आलं आहे. राहुल हांडोरे याचा स्वत:चा पोन बंद आहे. पण त्याने दुसऱ्या कोणाच्या तरी फोनवरुन घरच्यांना फोन केला होता. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्याने आपल्या घरच्यांना सांगितलंय. राहुल हांडोरेच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथकं नेमली आहेत.